कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रूग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्हा रुग्णालयाची मान्यता रद्द झाली आहे,अशी धक्कादायक माहिती माजी मंत्री, आमदार प्रकाश आवाडे यांनी शनिवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवण्याचा आपला प्रयत्न असून त्याला खोडा घातला जात आहे. कोल्हापुरात आणखी एक रुग्णालय सुरू करून त्याला जिल्हा रुग्णालय रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्याची धडपड सुरू आहे. हा विरोध मोडून इचलकरंजीतील रुग्णालयाला जिल्हा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे,असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

इंदिरा गांधी रुग्णालयातील समस्यांवरून आवाडे यांनी जिल्ह्यातील मंत्र्यांवर टीकास्त्र टाकले होते. याबाबत ते म्हणाले, आपण आवाज उठल्यामुळे रुग्णालयात काम सुरू झाले आहे. नवीन प्राणवायू प्रकल्प उभारला जात असून दिवसाला ४०० जम्बो सिलेंडर प्राणवायू उपलब्ध होणार आहे. बांधकामासाठी साडेबारा कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातून तिसऱ्या मजल्यावर कामे होणार आहेत. त्यानंतर रुग्णालयात ३०० खाट उपलब्ध होऊ शकतात. त्याआधारे येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळू शकते. परंतु या कामात आडकाठी आणण्यासाठी रुग्णालय २५० खाटचे व्हावे, असा काहींचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा- कोल्हापूरातील ‘सीपीआर’चा जिल्हा रुग्णालयाचा दर्जा रद्द – प्रकाश आवाडे

राजकारण टाळले पाहिजे

रुग्णालयातील ९३ पदे रिक्त आहेत. सेवेत असलेल्या ४२ कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी भरती केल्यास केवळ ४१ पदे भरावी लागणार आहेत. तथापि मूळ विषयाला बगल देऊन श्रेय वादासाठी नवनव्या विषयावर चर्चा होत असून यातील राजकारण टाळले पाहिजे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोल्हापुरात भेटणार असून इंदिरा गांधी रुग्णालय, वस्त्रोद्योगाबाबत प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District hospital status of cpr in kolhapur canceled says prakash awade srk
First published on: 12-06-2021 at 20:25 IST