विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला पहिला विजय मिळाला असून कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजारपेक्षा जास्त मत पडली असून शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ ९ हजार ५०० मतं पडली आहेत. हा महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान, या विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “संगमनेरमध्ये चौथीच्या मुलांनी मतदान केलं की…”, मविआ उमेदवार शुभांगी पाटलांचं वक्तव्य

काय म्हणाले ज्ञानेश्वर म्हात्रे?

“हा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा आहे. गेल्या सहा वर्षात मी जे काम केलं. त्याची पोचपावती आज कोकण विभागातील शिक्षकांनी दिली आहे. तब्बल ३३ संघटनाचा आम्हाला पाठिंबा होता. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझावर जो विश्वास टाकला, तो विश्वास आज सार्थकी लागला आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – MLC Elections Result: “सत्यजीत तांबे भाजपात जाणार नाहीत, कारण…”, दीपक केसरकरांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “पाठिंबा.,,”!

दरम्यान, ठाकरे गटाची संघटना असलेल्या शिक्षक सेनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत विचारलं असता, “या निडणुकीत भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय गट या तिघांचा मी उमेदवार होतो. शिक्षक सेना आम्हीच तयार केली होती. कोकणात जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी मी स्वत: शिक्षक सेना तयार केली होती”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – कसबा पेठ पोटनिवडणूक: शिवसेना आग्रही असल्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी शिवसेनेकडे ( ठाकरे गट) उमेदवारी मागितली होती. पण त्यांनी महाविकास आघाडी म्हणून बाळासाहेब पाटलांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, त्यानंतर मला भाजपाने सहकार्य केलं आणि त्यामुळे मी त्यांची उमेदवारी स्वीकारली”, असेही ते म्हणाले.