सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे एका मोटारसायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एक वॅगनार कार थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. दोडामार्ग-बेळगाव-कोल्हापूर मार्गावर दोडामार्ग येथील कलमठाणा येथे हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर अचानक आलेल्या मोटारसायकलस्वाराला वाचवण्यासाठी कार चालकाने प्रयत्न केला. या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार सुमारे बारा फूट खोल असलेल्या नदीपात्रात कोसळली. अपघाताच्या वेळी पात्रात पाणी असल्याने कारचालक राहुल गंवडळकर यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. नदीपात्रात कोसळल्याने कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.