मोठी बातमी! एकनाथ खडसे आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल

प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

(संग्रहीत)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे आठवडाभरापासून रूग्णलयात असून त्यांच्यावर उपाचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बे रूग्णालयात ते उपचार घेत असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मूत्रामार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडेस यांना रूग्णलयात दाखल करण्यात आलेलं आहे.

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. खडसे यांच्या जावयाला ईडीकडून करण्यात आलेली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे.

एकनाथ खडसेंनी पदाचा गैरवापर केला; झोटिंग समितीच्या अहवालात ठपका

एकनाथ खडसे यांच्यावरील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने ३० जून २०१७ रोजी गोपनीय अहवाल शासनाकडे सादर केला होता. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून २०१६ रोजी न्या. झोटिंग यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीचे कामकाज ३ मे २०१७ पर्यंत चाललं. त्यानंतर ३० जून रोजी समितीने सरकारला गोपनीय अहवाल सादर केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eknath khadse has been in hospital for a week msr

ताज्या बातम्या