Eknath Shinde To Be Deputy CM: गेल्या १२ दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणूक निकालांवर मोठी चर्चा पाहायला मिळाली. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे मानलं जात होतं. पण यातलं काहीही महायुतीकडून अधिकृतरीत्या जाहीर केलं जात नव्हतं. अखेर दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्यासोबत अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हेही नक्की झालं. पण एकनाथ शिंदे यांच्याबाबत संदिग्धता कायम असल्याचं दिसून आलं. गेल्या दोन दिवसांपासून चाललेल्या अनेक भेटीगाठी, बैठका आणि राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला असून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचं मान्य केलं आहे.

“आज साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे. आम्ही शिवसेनेच्या वतीने सर्वच आमदारांनी एकनाथ शिंदेंना विनंती केली होती की कोणत्याही स्थितीत त्यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायला हवं. शिवसेना आमदार, शिवसैनिक, महायुतीचे आमदार व देवेंद्र फडणवीसांनी स्वत: केलेली विनंती याला मान देऊन एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं मान्य केलं. आम्ही त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आलो होतो. त्यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शिफारसीचं पत्र आम्हाला त्यांनी दिलं. ते आम्ही आता राजभवनावर येऊन प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्याकडे सुपूर्द केलं आहे”, असं शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितलं.

News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
Devendra Fadnavis Eknath Shinde ajit pawar (1)
एकनाथ शिंदे की अजित पवार, अधिक विश्वासू सहकारी कोण? देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक उत्तर
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”

“कोंडी नव्हतीच”, उदय सामंत यांनी मांडली भूमिका

“या प्रक्रियेत कोंडी अजिबात नव्हती. देवेंद्र फडणवीस असो किंवा आम्ही माजी मंत्री असोत, शिवसेनेचे पदाधिकारी-खासदार असोत, आम्हा सगळ्यांची इच्छा होती की एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये असणं आमच्या दृष्टीने आवश्यक होतं. आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदेंना तशी विनंती केली होती. एकनाथ शिंदेंनी संघटन प्रमुख म्हणून, पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर फिरून पक्षाचं काम करायचं आणि इतर कुणालातरी संधी द्यायची हा विचार केला होता. पण हे आम्हाला मान्य नाही असं आम्ही त्यांना सांगितलं. ते उपमुख्यमंत्री व्हायला हवेत, ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा होती. ती आज एकनाथ शिंदेंनी पूर्ण केली त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत”, असंही उदय सामंत म्हणाले.

Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचं उद्धव ठाकरे, शरद पवारांना निमंत्रण; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सगळ्यांनी…”

महत्त्वाच्या खात्यांवरून मतभेद? उदय सामंत म्हणतात…

“यात काहीही तथ्य नाही. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांशीही स्पष्टपणे बोलू शकतात. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशी स्पष्टपणे ते बोलू शकतात. खातेवाटप किंवा मंत्रीपदावर तिन्ही नेते एकत्र बसून योग्य प्रकारे सोडवतील. त्यात वेगळं चित्र निर्माण करण्याची कुणाचीही इच्छा नाही. हेदेखील स्वत: एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे”, अशा शब्दांत उदय सामंत यांनी मतभेदांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

Story img Loader