Maharashtra Government Formation Update : प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले एकनाथ शिंदे आता रुग्णालयातून बाहेर पडले असून मुंबईतील वर्षा या निवासस्थानी रवाना झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर येत होती. सुरुवातीला त्यांनी दरे येथील त्यांच्या गावी विश्राम केला. त्यानंतर गेले दोन दिवस ते ठाण्यात मुक्कामी आहे. ज्युपिटर रुग्णालयात नियमित तपासणी करून झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि अवघ्या दोन वाक्यांतच त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.

एकीकडे राज्यातील सरकार स्थापन आणि खातेवाटपावरून महायुतीच्या नेत्यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती शनिवारी बिघडली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या धावपळीमुळे आराम करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडली होती. तिथे त्यांनी शनिवारी दिवसभर विश्रांती घेतली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ते ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी परतले. सोमवारी ते पुन्हा पक्ष आणि महायुतीच्या बैठकांमध्ये सक्रिय होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सोमवारीही त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी दिवसभरातील बैठका रद्द करून घरीच विश्रांती घेतली. त्यानंतर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. चाचण्या करून झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

हेही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा, वैद्यकीय तपासणीनंतर मुख्यमंत्री मुंबईतील वर्षा निवासस्थानी रवाना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझी प्रकृती उत्तम

यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “चेकअपसाठी आलो होतो आणि आता प्रकृती उत्तम आहे.” ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये कोणतीही चिंताजनक बाब नसल्याचे समोर आले. तपासणीनंतर रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे आपला ताफा घेऊन मुंबईतील वर्षा निवासस्थानी रवाना झाले. याठिकाणी ते बैठका घेणार की नाही, याबाबत मात्र अद्याप समजू शकलेले नाही.