हरबरा पिकाची काढणी चालू असताना तोल जाऊन मळणी मशिनमध्ये पडल्याने माळेवाडी येथील गोकुळ राजधर औताडे (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हवामान खात्याने गारपीट होण्याची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांची पिके काढण्याची धांदल सुरू आहे. औताडे हे मळणी मशिनमध्ये हरबरा पीक टाकत असताना अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष भास्कर औताडे यांचे ते बंधू होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2015 रोजी प्रकाशित
मळणी मशिनमध्ये पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
हरबरा पिकाची काढणी चालू असताना तोल जाऊन मळणी मशिनमध्ये पडल्याने माळेवाडी येथील गोकुळ राजधर औताडे (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
First published on: 10-03-2015 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers unfortunate death fall in the threshing machine