बीड : बीड शहरापासून जवळ असलेल्या पाली गावातील धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधी सुरू असतानाच भरधाव पिकअप घुसल्याने अंत्यविधीतील एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी असून यासह सात ते आठ जण जखमी झाले आहेत.
बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर खाजगी रुग्णाला उपचार सुरू करण्यात आले आहेत.
पाली परिसरातील स्मशानभूमीत मृत आसराबाई किसनराव नवले यांचा अंत्यविधी सुरू होता. मात्र धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असलेले आहे का कंटेनर ने पिकप ला धडक दिली आणि या पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप अंत्यविधीत घुसला यात संभाजी विठ्ठलराव जाधव हे जागीच मयत झाले.तर इतर सात ते आठ जण अपघातात जखमी आहेत.
जखमींना तातडीने बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनेतील जखमीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींचीही नावे ओळखण्याचे काम सुरू असून, जिल्हा रुग्णालय प्रशासन सतर्क असल्याचे दिसून आले. दरम्यान, घटनास्थळी पोलीसही दाखल झाले असून, अपघाताची माहिती, पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.