सोलापूर : उजनी धरणातून २५ हजार आणि नीरा नदीचा ४२ हजार ७२४ हजार क्युसेक असा ७६ हजार ७२६ क्युसेक विसर्ग भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे भीमेच्या पात्रात पाण्याची मोठी वाढ होताना दिसून येते. यात पंढरपूरच्या भीमा अर्थात चंद्रभागा नदीपात्राभोवताली पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर आदी मोठी गावे नदीपात्रात येतात. त्यामुळे पंढरपूरसह अन्य गावांमध्ये लहान-मोठ्या प्रमाणामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

वीर धरणात पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने आज सायंकाळी सहा वाजता नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करून तो ४२ हजार ७२४ क्युसेक इतका सुरू करण्यात येत आहे. नीरा नदीतून हे पाणी भीमा नदीत जाते.

उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीच्या पात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून तो आज सायंकाळी पाच वाजता २५ हजार क्युसेकप्रमाणे सोडण्यात येणार आहे. हे दोन्ही विसर्ग मिळून ७६ हजार ७२४ क्युसेक इतकी वाढ भीमा नदीच्या पात्रात होत आहे. पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर आदी मोठी गावे नदीपात्रात येतात. त्यामुळे पंढरपूरसह अन्य गावांमध्ये लहान-मोठ्या प्रमाणामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२७ मिमी इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्याची सरासरी ११८.१ मिमी आहे. मात्र सांगोला (११६.२ मिमी, सरासरी १२१.५ मिमी), माळशिरस (८२.७ मिमी, सरासरी १०७.५ मिमी), मंगळवेढा (८३.३ मिमी, सरासरी ९१.९ मिमी) याप्रमाणे आहे.

पंढरपूरच्या भीमा अर्थात चंद्रभागा नदीपात्राभोवताली पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर आदी मोठी गावे नदीपात्रात येतात. त्यामुळे पंढरपूरसह अन्य गावांमध्ये लहान-मोठ्या प्रमाणामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.