Maharashtra Breaking News Live Updates: लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर संपली असून आज राज्यभरासह जगभरात बाप्पाच्या भक्तांकडून गणरायाचं स्वागत केलं जात आहे. घरोघरी मोठ्या भक्तिभावाने बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. मुंबई-पुण्यातील रस्त्यांवर लहान-मोठ्या गणेश मंडळांच्या मिरवणुकांचा उत्साह दिसून येत आहे. गणरायाला ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना दिली जात आहे. जंगी मिरवणुकांमधून बाप्पांच्या आगमनाची ग्वाही दिली जात आहे.
Ganesh Chaturthi 2025 Mumbai, Pune, Lalbaugcha Raja, Dagdusheth Halwai Darshan Live, 27 August 2025 : गणेशोत्सवासह महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी...
Ganesh Chaturthi 2025 Live: ‘बाप्पा अनेक गोष्टींसाठी कारणीभूत ठरतो’, ठाकरे बंधूच्या भेटीवर भुजबळांचे सूचक विधान
उद्धव ठाकरेंनी आज राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या घरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, गणपती बाप्पा अनेक गोष्टींसाठी कारणीभूत ठरतो. जर दोन भाऊ यानिमित्ताने एकत्र आले असतील तर ही चांगलीच गोष्ट आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.
वैष्णवी कल्याणकरने किरण गायकवाडसह सासरी साजरा केला लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, नवऱ्याबरोबरचे फोटो केले शेअर
Ganesh Chaturthi 2025: ‘उद्धव ठाकरे-राज ठाकरेंना शुभेच्छा’, काय म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे?
गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या दादर येथील निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बाप्पाच्या निमित्ताने कुणी एकत्र येत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
Ganesh Chaturthi 2025: उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागचा राजाच्या दर्शनाला
उद्धव ठाकरेंनी आज शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. यानंतर ते लालबागचा राजाच्या दर्शनाला गेले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व पुत्र आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.
शर्वरी वाघने कुटुंबाबरोबर साजरा केला गणेशोत्सव, गावाच्या घराची दाखवली झलक; पाहा
आई-वडिलांचा सांभाळ करणं ही कुठल्याही मुलामुलीची जबाबदारी - सुबोध भावे
Nanded Rain News: बाप्पांच्या स्वागतासाठी नांदेडला पावसाची हजेरी! सजावटीच्या साहित्यासह आकर्षक श्री मूर्तींनी बाजारात प्रचंड उत्साह
आयर्लंडच्या भूमीत हरितालिका पूजन, सातासमुद्रापारही परंपरेची जोपासना
छत्रपती संभाजीनगर: गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी परंपरेनुसार करण्यात येणाऱ्या हरितालिकेचे पूजन मंगळवारी थेट सातासमुद्रापार करून भारतीय संस्कृती जोपासल्याचा संदेश छत्रपती संभाजीनगरमधील एका भूमिकन्येने दिला. आयर्लंडमधील गोल्वे विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या कोमल अविनाश अंधारीकर या विद्यार्थीनीने आपल्या निवासस्थानी हरतालिका पूजन केले.
Ganesh Chaturthi 2025: लोकप्रिय मराठी अभिनेत्रींच्या घरी गणराय थाटात विराजमान, ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत शेअर केले फोटो
Ganesh Chaturthi 2025: मुंबईतील चिंतामणी गणेश मंडळात बाप्पांची भव्य मूर्ती विराजमान!
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुंबईतील चिंतामणी गणेश मंडळातील बाप्पांची विलोभनीय मूर्ती मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते आहे. पहिल्याच दिवशी 'चिंतामणी'च्या दर्शनाला मुंबईकरांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
विरार इमारत दुर्घटना : ऐन गणेशोत्सवात गणेशमूर्तीसह बेघर होण्याची वेळ
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सात ते आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त
Ganesh Chaturthi 2025: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची भव्य रथातून आगमन मिरवणूक…
उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंचं निवासस्थान 'शिवतीर्थ'वर दाखल झाले आहेत. राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब तिथे आल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही भावांच्या या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात मात्र तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
Photos: देशभरात ‘बाप्पा मोरया’चा गजर; लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी भाविकांची धावाधाव…
Ganesh Chaturthi 2025, Photos: देशभरात ‘बाप्पा मोरया’चा गजर; लाडक्या गणरायासाठी भाविकांची धावाधाव, पाहा फोटो
निवडणुकांचा माहोल… जळगावात गणेश मंडळांवर देणग्यांचा वर्षाव !
भारती सिंहच्या घरी बाप्पाचं आगमन, मुलगी व्हावी म्हणून केली प्रार्थना; म्हणाली, "माझ्या मुलाला बहीण…"
Ganesh chaturthi 2025: आज आपण लाडक्या गणरायावर आधारीत मालिका व त्यातील कलाकारांबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी पडद्यावर गणरायाची भूमिका साकारली आहे.
वसईतील गणेशोत्सवात 'लेझर लाईट'वर बंदी; पोलिसांचे निर्देश
भाईंदर : गणेशोत्सवानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; मनुष्यबळात वाढ, विविध पथकांची स्थापना
Ganesh Chaturthi 2025: उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी
गेल्या महिन्यात राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरेंच्या घरी येऊन त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी दाखल होत आहेत. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दर्शनाचं आमंत्रण दिल्यानंतर त्यानुसार उद्धव ठाकरे दादरमधील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी दर्शनासाठी येत आहेत.
पिंपरी: आयुक्तांकडून विसर्जन घाटांची पाहणी; आवश्यक सुविधा पुरविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
Ganeshotsav 2025 : जिल्ह्यात १ लाख ०२ हजार १९८ गणेशमुर्तींची आज प्रतिष्ठापना होणार; बाजारपेठा गजबजल्या, मात्र गणेशभक्तांमधे उत्साह
Ganeshotsav 2025: गणरायाचे आज वाजत-गाजत आगमन, महोत्सवावर महागाईचे ‘विघ्न’; मूर्तींसह सजावटीचे साहित्य महागल
नाशिकमध्ये गणेशोत्सवात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त
बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न, 'यवतमाळचा राजा' मदतीला धावला…
Ganesh Chaturthi 2025: ७५०० पुस्तकांनी साकारला बाप्पा!
चेन्नईमध्ये तब्बल ७५०० पुस्तकांनी बाप्पाची मूर्ती साकारली आहे. त्यात तामिळ भाषेतील ५००० भगवद्गीता, १५०० वेलवृथम आणि १००८ मुरुगन केवसम ही पुस्तकं आहेत.
Ganesh Chaturthi 2025: “तू करमणुकीचा धंदा करून पोट भर, पण…”, अथर्व सुदामेच्या रीलवर ब्राह्मण महासंघाचा संताप; व्हिडीओ डिलीट करत सुदामे म्हणाला…”
Atharva Sudame on Ganeshotsav : ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी सुदामेवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "तू तुझा करमणुकीचा धंदा कर आणि स्वतःचं पोट भर. इतर गोष्टींमध्ये लक्ष घालू नको."
Ganesh Chaturthi 2025: सावंतवाडी : सालईवाडा येथील श्रींचे आगमन, लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद; स्वातंत्र्यपूर्व काळापासून उत्सव
लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला तळकोकणातून प्रतिसाद देत प्रतिष्ठापना केलेला पहिला सार्वजनिक गणपती सावंतवाडीतील 'सालईवाड्याचा राजा'.
Who is Atharva Sudame : गणपतीच्या रीलमुळे चर्चेत आलेला अथर्व सुदामे कोण आहे? राज ठाकरेंनी त्याचं कौतुक का केलं होतं?
Content Creator and Social Media Influencer Atharva Sudame Controversy : अथर्व सुदामेने पोस्ट केलेलं रील, ब्राह्मण समाजाच्या आक्षेपानंतर त्याने डिलिट केलं आहे आणि दिलगिरी व्यक्त केली आहे.
चैतन्यसोहळ्याचा श्रीगणेशा... (Express Photo by Akash Patil)
Ganesh Chaturthi 2025 Mumbai, Pune, Lalbaugcha Raja, Dagdusheth Halwai Darshan Live, 27 August 2025 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.