वाई:महाबळेश्वर येथील कोळी आळीत दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत जनरेटरच्या इंधनाच्या पाईप ढिला झाल्यामुळे मोठा स्फोट झाला.या स्फोटात दहा लहान मुले  भाजून गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर सातारा येथे नंतर  काही मुलांची प्रकृती गंभीर झल्याने त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. महाबळेश्वर येथील कोळी आळी मधील दुर्गामाता मंडळाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत, ते…”, जुना प्रसंग सांगत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

विसर्जन मिरवणूक मुख्य मार्गावरून जात असताना जनरेटरच्या पेट्रोल पाइपला गळती लागली आणि जनरेटरने पेट घेतला. या आगीत दुर्गादेवीच्या मूर्तीजवळ बसलेली चार ते सात वयोगटातील दहा मुले भाजली असल्याची माहिती समोर येत आहे.मुलांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने मुले भाजली  आहेत.सर्व जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमी मुलांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.सद्या या मुलांची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा >>> सातारा येथे शाही दसऱ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन

या घटनेची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील यांनी वाईतील दसऱ्याचे कार्यक्रम सोडून साताऱ्यातील रुग्णालयात धाव घेतली.प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनीही या घटनेची माहिती मिळताच  सातारा येथील रुग्णालयाशी संपर्क साधला.तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून माहिती घेतली. त्याचप्रमाणे सातारा येथील डॉक्टरांशी त्यांनी संपर्क साधून सूचना केल्या आहेत. सध्या सर्व मुले सातारा येथील रुग्णालयात पोहोचली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माजी नगरसेवक संतोष शिंदे हे  जखमी मुलांसोबत आहेत.काही मुले जास्त भाजल्याने आमदार मकरंद पाटील यांनी डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Generator blast during durga devi immersion procession at mahabaleshwar zws
First published on: 24-10-2023 at 23:49 IST