पुणे : मुसळधार पावसामुळे जाहिरात फलक (होर्डिंग) बँड पथकाच्या वाहनावर कोसळल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात शनिवारी सायंकाळी घडली. होर्डिंग पडल्याने बँड पथकातील घोडा जखमी झाला. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही.

मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर बेकायदा जाहीरात फलकांचा प्रश्न ऐरणीवर आला. बेकायदा जाहिरात फलक काढून टाकण्याचे आदेश पुणे, मुंबई, ठाणे महानगरपालिकेने दिले. सोलापूर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लोणी काळभोर परिसरात जाहिरात फलक कोसळला. त्यावेळी तेथून निघाालेल्या बँड पथकाच्या वाहनावर कोसळला. बँड पथकातील घोडा जखमी झाला. या घटनेचे माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.

Sowing on lakhs of hectares was stopped water scarcity continued even at the end of June
लाखो हेक्टरवरील पेरण्या रखडल्या, जूनअखेरीसही पाणी टंचाई कायम; कृषिप्रधान बुलढाण्यातील भीषण चित्र
Wireman, Wireman Sustains Burns, Power Line Repair, Wireman Sustains Burns Panvel, adai village, panvel news,
ग्रामीण पनवेलमध्ये महावितरण कंपनीचे वायरमेन जखमी
pune 11 unregistered vehicles
पुण्यात विनानोंदणी ११ वाहने रस्त्यावर अन् ३ अल्पवयीन चालक आढळले! कल्याणीनगर अपघातानंतर आरटीओला जाग
Residents of MIDC distressed by overnight digging of Metro on Shilphata Road in Dombivli
डोंबिवलीतील शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोच्या रात्रभराच्या खोदाईने एमआयडीसीतील रहिवासी त्रस्त
Om Orthopedic Hospital,
कोल्हापुरातील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला दणका; जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याने ५० हजारचा दंड
blast in dombiwali
डोंबिवलीत दत्तनगरमध्ये चायनिज सेंटरमध्ये सिलिंडरचा स्फोट; तीन जण गंभीर जखमी, दोन अत्यवस्थ
nagpur ram jhula accident
हिट अँड रन… नागपुरातील रामझुला अपघात प्रकरण पुन्हा चर्चेत; आरोपी महिलेला जामीन मिळणार की…
One injured in bullock stampede in bullock cart race
पनवेल : बैलगाडा शर्यतीमध्ये बैलाच्या ठोकरीत एक जखमी