जळगाव जिल्हा बँकेची शनिवारी ( ११ मार्च ) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. पण, राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी आयत्यावेळी बंडखोरी करत शिंदे गटाकडून अर्ज दाखल करत विजय मिळवला आहे. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीकास्र डागलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “माझ्यामुळेच जिल्हा आणि सहकार आहे, असा खडसेंचा गैरसमज होता. बँकेत, दूध संघात, विधानसभेत आणि जिल्ह्यातही मीच हा खडसेंचा अहंमपणा जास्त होता. तो आता उतरला आहे. माणूस जास्त हवेत उडायला लागला, तर किती खाली जोरात आपटतो, यापेक्षा दुसरं उदाहरण असू शकत नाही.”

हेही वाचा : जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंचा काँग्रेस, ठाकरे गटावर आरोप; म्हणाले…

“…अन् तिथे ते निवडून येऊ शकत नाही”

“भाजपात असताना खडसे म्हणायचे सर्व माझ्यामुळे आहे. पक्षातून बाहेर पडल्यानंतर स्वत:चा मतदारसंघ खडसेंना टिकवता आला नाही. तिथे ते निवडून येऊ शकत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते, आता कुठे येऊन पडलेत,” असा टोला गिरीष महाजनांनी लगावला आहे.

हेही वाचा : “मंत्रीपदाचा सट्टा लावूनच आम्ही…”, गुलाबराव पाटलांचं सत्तासंघर्षाबाबत विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…त्यांना जागा दाखवली”

“दूधसंघाच्या निवडणुकीत खडसेंच्या पॅनेलचं कोणीच निवडून आलं नाही. मागील वर्षी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपाने बहिष्कार टाकला होता. तेव्हा खडसेंनी आमच्यावर टीका-टीप्पणी करत, मीच कसा बाहुबली आहे, हे दाखवलं होतं. आता वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेनं ( शिंदे गट ) त्यांना जागा दाखवली,” असा घणाघात गिरीश महाजनांनी खडसेंवर केला आहे.