अलिबाग – पर्यटक म्हणून आलेल्या मुंबईतील गोरेगाव येथील तरूणीने अलिबागमधील एका कॉटेजमध्‍ये आत्‍महत्‍या केली. नेहा अविनाश पोतदार असे या ३४ वर्षीय तरूणीचे नाव असून विष प्राशन करून तिने आपले जीवन संपवले. नेहा आर्ट ऑफ लिव्‍हींगची शिक्षिका होती.  मागील काही दिवसांपासून ती हिमाचल प्रदेश मध्‍ये आर्ट ऑफ लिव्‍हींगचे शिक्षण देत होती.

हेही वाचा >>> कुत्र्याला बाहेर सोडू नका सांगणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; थेट पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेथून ३० सप्‍टेंबर रोजी ती थेट अलिबागला आली. अलिबागच्‍या कुरूळ येथील एका कॉटेजमध्‍ये ऑनलाइन बुकींग करून राहिली होती. बुधवारी सकाळी ती रूमबाहेर आली नाही म्‍हणून कर्मचारयाने दरवाजा वाजवला. तरीही प्रतिसाद न मिळाल्‍याने पोलीसांना पाचारण करण्‍यात आले. पोलीसांनी दरवाजा उघडला असता ती रूममध्ये मृतावस्‍थेत पडलेली आढळून आली. नेहाने आपले आयुष्य संपविण्यापुर्वी एक चिठठी लिहून ठेवली होती. त्‍यामध्‍ये या घटनेला कोणालाही जबाबदार धरू नये असा मजकूर होता. तसेच कॉटेजचे भाडे व जेवणवाल्याचे उर्वरीत पैसेही ठेवले होते. नेहाचा मृतदेहाचा पंचनामा झाल्या नंतर तिचा मृतदेह शवविच्छेदन करून तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.