मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आणि भाजपाचे काही नेते अलीकडेच गुवाहाटी दौऱ्यावर गेले होते. या गुवाहाटी दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

शिंदे गटातील आमदारांना खूश ठेवण्यासाठी पुन्हा एकदा गुवाहाटीमध्ये प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप खैरे यांनी केला. ही सर्व रक्कम बबड्या नावाच्या प्राण्याजवळ गोळा करण्यात आली होती, असंही खैरे म्हणाले.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंची पुन्हा शिवाजी महाराजांशी तुलना; गनिमी काव्याचा उल्लेख करत संजय गायकवाडांचं मोठं विधान

चंद्रकांत खैरेंच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे पाच कोटी रुपये मोजायला आले होते का? असा सवाल गुलाबराव पाटलांनी विचारला. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- VIDEO: “चंद्रकांत खैरे नावाचा बुड्ढा पिसाळल्यासारखं…” एकेरी उल्लेख करत संजय गायकवाडांची टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, “ज्यावेळी महाराष्ट्रात सत्तांतर झालं, त्यावेळी आम्ही नवस मागितला होता. जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचं सरकार येईल, तेव्हा आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाऊ… त्यामुळे आम्ही सगळेजण कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेलो. त्यामुळे जर कुणी म्हणत असेल की, आम्ही पाच कोटी घेतले, तर ते पाच कोटी मोजायला गेले होते का? असा माझा सवाल आहे. पण माणूस ज्या देवाकडे नवस करतो, तो नवस पूर्ण करण्यासाठी जात असतो, अशी आपली पद्धत आहे” असंही पाटील म्हणाले.