शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. ही यात्रा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात आहे. त्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिंदे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल करत आहे. त्यावरून आता गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘पार्सल’ म्हटलं आहे.

“महाप्रबोधन यात्रेतून पक्षाची भूमिका मांडणे अपेक्षित आहे. मात्र, ही महाप्रबोधन यात्रा नसून, जिथे सभा झाल्या, तिथे जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. माझी जात काढली गेली, माझ्या आई-वडिलांवर बोलल गेलं. मुख्यमंत्र्यांच्या मराठा समाजाबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली,” असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

हेही वाचा : मुक्ताईनगरमध्ये सुषमा अंधारेंच्या सभेवर बंदी, अंबादास दानवे आक्रमक; म्हणाले “सत्ताधारी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आधीच राष्ट्रवादीने शिवसेना संपवली आहे. शिल्लक राहिलेली शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीतून आलेलं पार्सल आहे. अशा पार्सल पासून सावध राहा. तुमचा पक्ष डब्यात नेल्याशिवाय ते राहणार नाही,” असे सुषमा अंधारेंचं नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.