हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील वारंगाहून बोथीकडे जाणाऱ्या १ हजार १०० के.व्ही. वारंगा शिवारात लोंबकळलेल्या विद्युत वाहिनीच्या तारेचा धक्का लागल्याने वारंगा फाटा येथील एका शेतकऱ्याचा सोमवारी मृत्यू झाला तर दोघे जखमी आहेत. मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव अप्पाराव पतंगे असे आहे.

लोंबकळणाऱ्या तारातील वीज प्रवाहाचा धक्का लागल्याने वारंगाफाटा शिवारात गट क्र.४९४ मध्ये अप्पाराव दाजीराव पतंगे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर गणेश जाधव व पंजाबराव पतंगे हे दोघी जखमी झाले आहेत. शेताची खासगी मोजणी करताना हा अपघात घडला.