HSC Result 2025 Latur: बारावीच्या परीक्षेत लातूर परीक्षा मंडळात मुलींनीच आघाडी घेतली आहे. लातूर मंडळातील 91,6 99 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 90 हजार 277 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यातील 80 हजार 770 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण 89.46% इतके आहे. या परीक्षा मंडळात 42 हजार 338 मुले व 38 हजार 432 मुलींनी परीक्षा दिली.
मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 85.99% इतके आहे तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 93.63% आहे. सुमारे आठ टक्के मुलांपेक्षा मुली गुणवत्तेत पुढे आहेत. बारावीच्या निकालात 75 टक्केपेक्षा अधिक गुण घेतलेले 6292, 60% पेक्षा अधिक गुण घेतलेले 23 हजार 545, 45% पेक्षा अधिक गुण घेतलेले ४०,४०८ तर उत्तीर्ण श्रेणीत दहा हजार 525 विद्यार्थी आहेत.
विज्ञान शाखेत 49,767 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली 48,231 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण 96.91% इतके आहे. वाणिज्य शाखेत सात हजार नऊशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली सात हजार 134 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण 90.30% आहे. कला शाखेत 29,360 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली 22896 विद्यार्थी उत्तीर्ण झाले हे प्रमाण 77.98% इतके आहे .व्यवसाय अभ्यासक्रमात 2758 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली उत्तीर्ण 2086 झाले हे प्रमाण 71.63% इतके आहे. लातूर परीक्षा मंडळात नांदेड ,धाराशिव, लातूर हे तीन जिल्हे येतात.
सर्वोत्कृष्ट निकाल धाराशिव जिल्ह्याचा आहे या जिल्ह्यातील 15,318 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली 14142 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 92.32% इतके उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यातील 39,861 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली 36 हजार 202 विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्णतेचे प्रमाण 90.82% इतके आहे. लातूर जिल्ह्यातील 35,0 98 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली 30,426 विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्णतेचे प्रमाण हे 86.46% इतके आहे.