मी फोटोग्राफी करायचो, व्यंगचित्र काढत होतो. पण, मुख्यमंत्री होईन, असं कधीच वाटलं नव्हतं. मी मुख्यमंत्री होण्यास शरद पवार जबाबदार आहेत. मुख्यमंत्री असताना जमेल ते काम केलं, असं विधान शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पत्रकार राहुल गडपाले यांच्या ‘अवतरणार्थ’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

“राहुल गडपालेंनी सांगितलं की, ‘बऱ्याच क्षेत्राचा अभ्यास केला. मात्र, अंतिम ज्या क्षेत्रात रमले त्याचा अभ्यासच केला नव्हता.’ तसेच माझे झाले आहे. मी सुद्धा फोटोग्राफी करायचो, व्यंगचित्र काढत होतो. पण, मुख्यमंत्री होईन, असं कधीच वाटलं नव्हतं. मी मुख्यमंत्री होण्यास शरद पवार जबाबदार आहेत,” असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं अन् एकाच हशा पिकला.

हेही वाचा : “घरी बसण्याची सवय होतीच, आता…”, ग्रामपंचायत निवडणूक निकालांवरून मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका

“मात्र, मुख्यमंत्री असताना जमेल ते काम मी केलं आणि महाराष्ट्रातील जनतेनं मला स्वीकारलं. मला महाराष्ट्राच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मान मिळाला आहे. तीच माझ्या आयुष्यातील कमाई आहे,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

हेही वाचा : “इंडिया आघाडीवर मंथन करणे गरजेचे”; नितीश कुमार आणि ओमर अब्दुल्लांच्या ‘त्या’ वक्तव्यांवर ठाकरे गटाची उघड नाराजी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला या कार्यक्रमात अमरावतीकर दिसत आहेत. मी जर असं म्हणलो की, ‘भाई और बहनो, मेरा अमरावतीसे बोहोत पुराना रिश्ता है.’ कारण, माझी आजी ही अमरावतीतील परतवाड्याची आहे. मी फेकाफेकी करणारा नाही. उगाचच सगळीकडे ‘करीबी रिश्ता है’ सांगत नाही. जे रिश्ते आहेत ते आहेत. जे नाहीत ते नाही,” असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.