कोल्हापूर : गुंतवलेल्या रकमेवर दाम दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवासह अन्य राज्यातील लाखांवर गुंतवणूकदारांना सुमारे ३ हजार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप असलेला एएस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. त्याला कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी राष्ट्रीय महामार्गावर अटक केली.

त्यामुळे एका मोठ्या आर्थिक गुन्ह्याचा उलगडा झाला असून यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे. लोहित सिंह सुभेदार याने एएस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स ही कंपनी स्थापन केली होती. याद्वारे गुंतवलेल्या रकमेवर दाम दुप्पट परतावा देण्याचे त्याने आमिष दाखवले होते. त्याला भुलून राज्यभरातील हजारो ठेवीदारांनी कोट्यावधी रुपये कंपनीत गुंतवले होते. या कंपनीच्या राज्यभरात अनेक ठिकाणी शाखा होत्या. या कंपनीची कोल्हापुरातही शाखा होती.

हेही वाचा : आमंत्रण नसताना बिबट्या पार्टीला; पोरांची मात्र पळता भुई थोडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवासह अन्य राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुभेदारसह २९ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गेल्या महिन्यात सुभेदार याचा विश्वासू सहकारी व फरारी संचालक अमित अरुण शिंदे याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. आता मोरक्या सुभेदार याला अटक झाली असल्याने या घोटाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता वाढली आहे.