सांगली : पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ओबीसीचे १६० आमदार निवडून आणून सत्ता हाती घेतल्याशिवाय ओबीसींची क्रांती थांबणार नाही असे प्रतिपादन ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी गुरुवारी केले. ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जत मध्ये सकल ओबीसी समाजाकडून धडक मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा : “देवेंद्रभाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो”, नवाब मलिकप्रकरणी सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जत तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जत तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंत्री छगन भुजबळ यांना व त्यांच्या सह ओबीसी नेत्यांना संरक्षण द्यावे त्याचबरोबर बिहारच्या धर्तीवर जनगणना करण्यात यावी तसेच मराठा समाजाला ओबीसी ऐवजी अन्य घटनात्मक स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसी महामंडळांना भरघोस निधी द्यावा यासह विविध मागण्या या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आल्या.