scorecardresearch

Premium

ऊस दरासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या गव्हाणीत उड्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या आहेत.

sangli swabhimani shetkari sanghtana protest, rajarambapu sugar factory,
ऊस दरासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या गव्हाणीत उड्या (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सांगली : सांगली जिल्ह्यातील ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून काटा बंद आंदोलनात शुक्रवारी गव्हाणीत उड्या मारुन गाळप बंद पाडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील साखराळे येथील राजारामबापू साखर कारखान्यामध्ये हा प्रकार घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या आहेत.

हेही वाचा : “काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना काँग्रेसने घाम फोडला”, पाच राज्यांच्या निवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

combative attitude of Sikh community
चाहे हंजूगॅस बरसाओ, या गोळीया… शेतकरी आंदोलनात ‘जट्ट दा जुगाड’
sarwan singh pandher
‘आम्ही पाकिस्तानमधून नाही आलो’, पोलीस दलाच्या कारवाईनंतर शेतकरी नेत्याचे विधान
Cases registered against BJP workers for Slogans in support of MLA Gaikwad in Ulhasnagar
उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, न्यायालय परिसरात आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
ravindra-dhangekar-12
आंदोलन करणाऱ्या मविआच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची धक्काबुक्की; आमदार धंगेकर म्हणाले, “पुणे पोलिसांची…”

या ठिकाणी साखर कारखान्याचा आतील ऊस काटा बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांकडून या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांचा दबाव झुगारून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या आत घुसून उसाचा गाळप बंद पाडण्यासाठी उसाच्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In sangli swabhimani shetkari sanghtana protest for sugarcane price in rajarambapu sugar factory sakharale css

First published on: 01-12-2023 at 13:33 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×