वाई : मुख्यमंत्री मराठा आरक्षण नक्की देतील अशी ग्वाही देताच आरक्षण उपसमितीचे सदस्य पालकमंत्री शंभूराज देसाई यांना आंदोलकांनी धारेवर धरले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. संतप्त आंदोलकांनी दोन दिवस इथे आंदोलनाला बसून बघा, असं आव्हानही देसाईंना दिले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. एका बैठकीसाठी पालकमंत्री शंभूराजे देसाई जिल्हाधिकारी कार्यालयात आले, तेव्हा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली .या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य असलेले पालकमंत्री शंभूराज देसाई आंदोलकांना भेटण्यास गेले.

हेही वाचा : मनोज जरांगेंची प्रकृती खालवल्यानंतर लेकीनं सांगितलं घरातलं दु:ख; म्हणाली, “मम्मी सतत रडतेय, आजोबाही…”

यावेळी सरकार पातळीवर आरक्षणावर गांभीर्यपूर्वक विचारविनिमय सुरु आहे. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो असून लवकरच मुख्यमंत्री आरक्षण देतील. मुख्यमंत्र्यांनीच तशी शपथ घेतली आहे. अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी देताच, आंदोलकांनी त्यांना धारेवर धरले. अनेक प्रश्नांचा भडीमार केला. तुमच्या सरकारने आरक्षणासाठी मराठा समाजाला झुलवत ठेवले आहे. केवळ सहानभूती दाखवू नका, आरक्षण कधी देताय ते सांगा. मुख्यमंत्र्यांच्या शपथेवर आमचा विश्वास नाही, असे सुनावले.

हेही वाचा : उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगेंचे हात थरथरले; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांच्याबरोबरच्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांच्या सर्वात जवळचे मंत्री म्हणून तुमची ओळख आहे. पण तुम्ही आरक्षणासाठी काय केले. मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातले असून आम्हाला काय फायदा. मराठा आरक्षणा संदर्भातील शिंदे समितीला परस्पर वेळ वाढवून दिला, त्याचे कारण काय, आदी अनेक बाबींवरून पालकमंत्र्यांना धारेवर धरले. यावेळी देसाई यांनी हे सरकार मराठा आरक्षण नक्की देईल मुख्यमंत्री त्यासाठी आग्रही असल्याचे सांगत बैठकीतून काढता पाय घेतला.