सोलापूर : सोलापूर शहरालगतच्या बाह्यवळण रस्त्यापैकी जुना चौत्रा नाका ते देगावजवळील सीएनएस रुग्णालयापर्यंतच्या २०० मीटर लांबीच्या आणि ५४ मीटर रुंदीच्या रस्त्यावर अडथळा ठरलेल्या १८ घरांची अतिक्रमणे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने हटविली. बाधित कुटुंबीयांना घरांसाठी सोरेगावात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जुना पुणे चौत्रा नाका ते वसंत विहार, देशमुख-पाटील वस्ती, देगावपर्यंत ५४ मीटर रुंदीचा बाह्यवळण रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. वाटेत देशमुख-पाटील वस्तीजवळ १८ घरांच्या अतिक्रमणामुळे जेमतेम २०० मीटर लांबीचा रस्ता अपूर्ण राहिला आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास पुणे महामार्गावरील वाहने सोलापुरात न येता या बाह्यवळण रस्त्यावरून सांगली कोल्हापूरकडे जाता येऊ शकते. परंतु, हा बाह्यवळण रस्ता अनेक वर्षांपासून रखडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी या प्रलंबित रस्त्याच्या प्रश्नावर लक्ष घातले. त्यातून संबंधित १८ घरांची अतिक्रमणांचा अडथळा दूर करण्यात आला. ही अतिक्रमणे हटविण्यात आल्यानंतर संबंधित बाधितांना सोरेगाव हद्दीत घरांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे पालिका आयुक्त डॉ. ओंबासे यांनी सांगितले.