वाई : तुतारीचा नाद आणि ताशाचा कडकडाट अशा जल्लोषी वातावरणात साताऱ्यात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदेनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर शिवसेनेचे नितीन बानुगडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने प्रमुख उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गांधी मैदानाचा परिसर दणाणून सोडला, यावेळी गोल बाग येथील प्रतापसिंह महाराज थोरले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . साताऱ्यात गांधी मैदान ते पोवई नाका अशी भव्य रॅली निघाली या रॅलीला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यामुळे वाहतूक कर्मवीर पथामार्गे वळवण्यात आली होती . गांधी मैदानावर सुद्धा पोलीस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात प्रचंड रेटारेटी झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन यामुळे महायुतीला जोरदार राजकीय संदेश गेला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान शरद पवार यांच्यासह निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला लोकसभेचा अर्ज दाखल केला.

आणखी वाचा-सोलापूर : नोकरी सोडण्यास नकार दिल्याने मुलीच्या डोळ्यादेखत पत्नीचा खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साताऱ्यातील गांधी मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय असे शक्तिप्रदर्शन झाले. यामध्ये महाविकास तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी हुमगांव (ता. जावळी) येथील हुमजाई देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. या शक्तिप्रदर्शन व अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमासाठी शरद पवार यांचे हेलिकॉप्टरने सकाळी साताऱ्यात आले होते.मिरवणुकीला आवर्जून उपस्थिती लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आपण नाराज नसल्याचे दाखवून दिले .