सातारा : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी वाई न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश आर. एम. मेहरे यांनी ठोठावली.

संबंधित आरोपीने लहान मुलीला फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी २०१५ साली सुरंजसिंग हिरासिंग राठोड (वय २०, रा. भोसे ता. महाबळेश्वर) याला अटक केली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी खरात यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालय समोर सुरू होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मेहरे यांनी संबंधित आरोपीला बाल लैंगिक अत्याचार अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय फुस लावून पळवून नेणे यासाठी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकाच वेळी भोगावयाच्या आहेत. सरकारी वकील म्हणून एम.यू. शिंदे यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजात न्यायालयीन पैरवी म्हणून हेमा कदम यांनी काम पाहिले.