जे उशिरा आले त्यांना पहिल्या रांगेत बसवलं असं विधान मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या भेटीनंतर बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण नाराज असल्याची कबुली दिली. धोका देणाऱ्यांचं राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता असून त्याला मंत्रीपद मिळतं असं उपहासात्मक भाष्यही त्यांनी केलं.

“जो उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसवलं आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवलं आहे. पण याची काही नाराजी नाही. राजकारणात असं चालू राहतं. आम्ही तितके समजूतदार आहोत. फक्त मंत्रिपदासाठी आम्ही गेलो नव्हतो. फक्त मंत्री आहे म्हणून बच्चू कडू नाही. मंत्रीपदापेक्षा बच्चू कडू जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचं जास्त दु:ख नाही,” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

Maharashtra Cabinet: बच्चू कडू यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले “नाराजी आहेच, त्यांनी शपथ घेऊन…”

पुढे ते म्हणाले “धोका देणाऱ्यांचंच राज्य आहे. जो जास्त धोका देणार, तो मोठा नेता होणार. धोका दिल्यानेच अनेक पक्ष मोठे झाले. भाजपा, शिवसेना असो किंवा इतर कोणी बंडखोरी सगळीकडे झाली आहे. कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत? बंडखोरांचंच राज्य आहे. बंडखोरी करुन येतो त्याला सर्वात आधी मंत्रीपद मिळतं”.

“नाराजी नाही असं नाही, थोडी नाराजी असतेच. पण ती इतकीही नाही की, आपलं घर सोडून दुसऱ्या पक्षात निघून जाऊ. ही क्षणिक नाराजी आहे. अजून पूर्णपणे मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. पूर्ण विस्तार झाला असता आणि संधी मिळाली नसती तर गोष्ट वेगळी असती,” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

Maharashtra News Live : महाराष्ट्राशी संबंधित विविध घडामोडी एका क्लिकवर…

“मी फक्त मंत्रिपदासाठी शिंदे गटाला पाठिंबा दिला नव्हता. काही मुद्द्यांच्या आधारे पाठिंबा दिला होता, जर ते मुद्दे विचारात घेतले नाही तर वेगळा विचार करु,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आश्वासन देण्यात आलं होतं, त्यामुळेच आम्ही मागणी करत आहोत, अन्यथा केलीही नसती असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकनाथ शिंदे यांनी आम्ही तुम्हाला मंत्री करु असं आश्वासन देत शपथ घेतली होती. पहिल्या यादीत नाव नसेल, तर अखेरच्या यादीत तरी असेल,” अशी आशा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. दुसरी यादी अडीच वर्षानंतर येऊ शकते असंही त्यांनी सांगितलं. राजकारणात काहीही होऊ शकतं, इथे दोन आणि दोन चार नाही तर पाच होतात असंही ते म्हणाले.