ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून अनेकदा चालू घडामोडी किंवा राजकीय घडामोडी यांच्यावर देखील टिप्पणी करत असतात. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या काही वक्तव्यांमुळे वाद देखील निर्माण झाले होते. मात्र, इंदुरीकर महाराज यांची वक्तव्य तुफान व्हायरल होत असतात. त्यांचे अजून काही व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागले असून त्यामध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींविषयी मिश्किल शब्दांत टिप्पणी केली आहे. जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांच्या मिश्किल टिप्पणीवर उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.

“तुम्ही बसा गावात बांध कोरत”

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांसह ते गुवाहाटीमध्ये एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. या पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराज यांची टिप्पणी व्हायरल होत आहे. “नुसत्या लोभ नावाच्या शब्दासाठी आख्खी मंडळी १५ दिवस एकत्र आली. विरोधक एकत्र आले. सगळे एकत्र आले. कुणाचीही हू नाही, चू नाही. आणि आपल्या गावातला पुढारी म्हणत राहातो ‘मी गेलो असतो लग्नाला पण तो आपल्या पार्टीत नाही’. शिका त्यांच्याकडून. आता म्हणेल का कुणी की हा विरोधक आहे? तुम्ही बसा गावात बांध कोरत. तुमची तर किंमतच संपली. तुमचं काही राहिलंच नाही”, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

“हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना ठणकावलं!

“तुम्हाला विचारलं का त्यांनी की आम्ही असं करतोय. तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड ठोकत बसा. सतरंज्या झटका आणि मरा. तुम्हाला अशी लाज वगैरे काही वाटत नाही का?” असं देखील इंदुरीकर महाराज यावेळी म्हणाले.

Narhari Zirwal Notice : एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या? विधानसभा उपाध्यक्षांची १६ बंडखोर आमदारांना नोटीस, ४८ तासांचे अल्टिमेटम

“समाजाला तुमचं काही देणंघेणं नाही. तुम्ही भजन सोडून कुणाच्याही नादी लागू नका. ज्यांच्या ताब्यात तालुके आहेत त्यांना मतदान कसं करावं हे शिकवावं लागतं. मग शहाणं कोण आहे? तीन वेळा बैठक झाली की बाबा हे असं कर, असं कर”, अशा शब्दांत इंदुरीकर महाराजांनी टोला लगावला. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या वेळी झालेल्या पक्षीय बैठकांच्या संदर्भात त्यांचं हे विधान असल्याचं म्हटलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आंदोलनं करणं सध्या फॅशन झाली आहे”

“लाईट गेली की मोर्चा, वायरमन आला नाही तर मोर्चा. नळाला पाणी आलं नाही मोर्चा. आंदोलन करणं ही फॅशन झालीये सध्या. कुणीही उठायचं आणि तीव्र आंदोलन करायचं. काय आंदोलन करतो डोंबल्याचं. कोण ऐकतं तुझं? हे लोक पोलिसांना आधीच सांगतात की आम्ही १० मिनिटं फक्त आंदोलनाला बसणार आहे. गुन्हे वगैरे काही दाखल करू नका. आपली येडपटं सकाळपासून बसतात. मग व्हीआयपी लोक भारी गाडीतून येणार. कागद. निवेदन देणार. मग त्यांचा फोटो पेपरमध्ये येणार”, असंही इंदुरीकर महाराज या कीर्तनात म्हणाले.