सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा विना परवाना पुतळा बसवण्याची घटना बुधवारी समोर आली. आष्ट्यानंतर ही दुसरी घटना आहे.
तासगाव तालुक्यातील आळते गावात पहाटे अज्ञात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना केल्याचे बुधवारी सकाळी दिसून आले. यानंतर गावासह तालुक्यात खळबळ माजली आहे.

हेही वाचा- राज्यातील साखर उद्योगावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील वर्षी पुतळा बसवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो प्रशासनाने पुतळा काढून ग्रामपंचायतच्या ताब्यात दिला होता. आता पुन्हा हाच पुतळा उभारला गेल्याने हा पुतळा कुणी उभारला याचा तपास केला जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रकारामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.