सातारा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून मेहुणीलाही मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी जन्मठेप आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. अरुण परबती बिरामणे (वाघजाईवाडी, ता. वाई) असे आरोपी पतीचे नाव आहे.

दि. २२ नोव्हेंबर २०१६ रोजी पत्नी निलम अरुण बिरामणे हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. मेव्हणी वर्षा ही बहिणीस सोडविण्यास गेली असता, तिच्यावरही धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या कारणास्तव अरुण बिरामणे याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बी. डी. होवाळ यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील दोन वर्षांपासून या खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्यासमोर सुरू होती. पैरवी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, मोहसीन शेख यांनी परिश्रम घेतले. न्यायालयीन कामकाजात पोलीस शिपाई भुजंगराव काळे, कीर्तीकुमार कदम, हेमलता कदम यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. वाई येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय झाल्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे.