राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या कालीचरण महाराज यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे कालीचरण महाराज म्हणाले आहेत. याबाबतचे वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिले आहे.

हेही वाचा >> Kalicharan Maharaj: पोलिसांनी अटक केलेले कालीचरण महाराज नेमके आहेत तरी कोण? महाराष्ट्राशी काय संबंध?

“आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. आपले देवी-देवता मारामारी करणारे आहेत म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का? छत्रपती संभाजी महाराज, गुरुगोविंद सिंह महाराज, राणा प्रतापजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का?” असे सवाल कालीचरण महाराज यांनी केले आहेत.

“आपले सगळे देवी-देवता हिंसक आहेत. उद्देश देश, धर्मासाठी असेल तर खून करणे काही वाईट नाही,” असेही कालीचरण महाराज म्हणाले आहेत.

हेही वाचा >> अकोल्याचा अभिजीत सारंग कसा बनला कालीचरण महाराज?, जाणून घ्या शिक्षण आणि कुटुंबाविषयी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वी कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर केला होता. तसेच गांधीजींना शिवीगाळ करताना मारेकरी नथुराम गोडसेला वंदनही केले होते. याबाबतची एक व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. याप्रकरणी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल आहे.