खंडाळ्याजवळ मालगाडीचे सहा डबे रुळावरुन घसरल्याने लांब पल्ल्याच्या मेल- एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीला फटका बसला आहे. शुक्रवारी सकाळी पुण्याहून मुंबईला येणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर गुरुवारी रात्री मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी एक्स्प्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी संध्याकाळी खंडाळ्याजवळ मालगाडीचे सहा डबे रुळावरुन घसरले. यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प आहे. तर मुंबईकडे येणारी वाहतूकही विलंबाने सुरु आहे. रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी कर्जत – पुणे या मार्गावर विशेष बस सोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी पुणे स्टेशन – ०२० २६१ ०६ ८९९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

या गाड्या रद्द किंवा मार्गात बदल
* ११००९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – पुणे सिंहगड एक्स्प्रेस (कर्जत येथे रद्द)
* १२१२५ – सीएसएमटी- पुणे प्रगती एक्स्प्रेस- रद्द
* १२१२३ – सीएसएमटी- पुणे डेक्कन क्वीन – रद्द
* ११०२३ – सीएसएमटी- कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस- रद्द
* १७४११ – सीएसएमटी- कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस- रद्द
* १७४१२ – कोल्हापूर- सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस- रद्द
* १२११५ – सीएसएमटी- सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस (मुंबई- पुणेदरम्यान रद्द)
* ५१०२९/५१०३३ – सीएसएमटी ते बिजापूर, साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर – रद्द
* ११०२४ – कोल्हापूर- सीएसएमटी सह्याद्री एक्स्प्रेस – रद्द
* १७३१८ – लोकमान्य टिळक टर्मिनस -हुबळी एक्स्प्रेस (पनवेल-मडगाव- वास्कोमार्गे हुबळी)
* ११०३० – कोल्हापूर- सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस (पुण्यापर्यंत धावणार, तिथून पुन्हा कोल्हापूरला रवाना होणार)
* ११००८ – पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस – रद्द
* १२१२८ – पुणे- सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस – रद्द
* ११३०२ – केएसआर बेंगळुरु- सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस (पुण्यापर्यंत धावणार, तिथून सिद्धेश्वर एक्स्प्रेस म्हणून धावणार)
* १७०१७ – राजकोट – सिकंदराबाद एक्स्प्रेस (कल्याण-इगतपूरी- मनमाड- अकोला मार्गे धावणार)
* १७६१३ – पनवेल – एचएस नांदेड एक्स्प्रेस (कल्याण-इगतपूरी- मनमाड मार्गे धावणार)
* १२७०१ – सीएसएमटी – हैदराबाद हुसैन सागर एक्स्प्रेस – रद्द
* १२१२६ – पुणे- सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस (शुक्रवार – ८ जुलै – रद्द)
* १२१२४ – पुणे – सीएसएमटी डेक्कन क्वीन (शुक्रवार – ८ जुलै – रद्द)
* ११०९५ – अहमदाबाद – पुणे अहिंसा एक्स्प्रेस (पश्चिम रेल्वेवरच धावणार)
* २२९४४ – इंदौर – पुणे एक्स्प्रेस (सुरतपर्यंतच धावणार)
* ११०३५ – दादर – म्हैसूर शरावती एक्स्प्रेस – रद्द
* ५१०३०/५१०३४ – बिजापूर/साईनगर शिर्डी – सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (पुण्यापर्यंत धावणार)
* ५१०२७/५१०३३ – सीएसएमटी- पंढरपूर/साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्स्प्रेस रद्द

‘या’ गाड्या कल्याण- इगतपूरी- मनमाड- दौंडमार्गे धावणार
११०१९ – सीएसएमटी – भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस
११०४१ – सीएसएमटी- चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस
१६३८१ – सीएसएमटी – कन्याकुमारी एक्स्प्रेस
१७०१७ – राजकोट – सिकंदराबाद एक्स्प्रेस
१२२६४ – हजरत निजामुद्दीन पुणे दुरांतो एक्स्प्रेस जळगाव- मनमाड-दौंड मार्गे पुणे अशी धावणार

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandala derailment list of trains cancelled short terminates diverted deccan queen pragati express sahyadri express
First published on: 07-09-2017 at 20:30 IST