महाराष्ट्रात आज (१५ जानेवारी) नव्याने ४२ हजार ४६२ करोना रूग्ण आढळले. यासह राज्यातील एकूण करोना रूग्णांची संख्या ७१ लाख ७० हजार ४८३ इतकी झाली आहे. मागील २४ तासात राज्यात २३ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. यासह एकूण करोना मृत्यूंची संख्या १ लाख ४१ हजार ७७९ इतकी झालीय. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७ टक्के एवढा आहे. दुसरीकडे राज्यात आज ३९ हजार ६४६ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ६७ लाख ६० हजार ५१४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२८ टक्के एवढे झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपर्यंत राज्यात एकूण ७ कोटी १७ लाख ६४ हजार २२६ नमुन्यांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७१ लाख ७० हजार ४८३ (९.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले. राज्यात सध्या एकूण २ लाख ६४ हजार ४४१ सक्रीय करोना रुग्ण आहेत. राज्यात सद्यस्थितीत २२ लाख १०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ६१०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ओमायक्रॉन रूग्णांची संख्या किती?

आज राज्यात १२५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत.

राज्यात कोठे किती ओमायक्रॉन बाधित रूग्ण?

नागपूर – ३९
मुंबई – २४
मीरा भाईंदर – २०
पुणे मनपा – ११
अमरावती – ९
अकोला – ५
पिंपरी चिंचवड – ३
औरंगाबाद, जालना, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर – प्रत्येकी २
नाशिक, कोल्हापूर, लातूर, सातारा, ठाणे मनपा आणि वर्धा – प्रत्येकी १

हेही वाचा : तुम्हाला करोनाचा किती त्रास होणार हे ठरवणाऱ्या महत्त्वाच्या ‘जीन’चा शोध, भारतात किती लोकांमध्ये अस्तित्वात? वाचा…

आजपर्यंत राज्यात आढळलेले एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधितांची संख्या १७३० इतकी झालीय. यापैकी ८७९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest corona covid 19 omicron infection total patient updates of maharashtra 15 january 2022 pbs
First published on: 15-01-2022 at 22:53 IST