मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस सरकारने अखेर खातेवाटप केलं आहे. या खातेवाटपात मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःकडे एकूण १३ खाती ठेवली आहेत. यात नेमक्या कोणत्या खात्यांचा समावेश आहे याचा हा आढावा.
१. सामान्य प्रशासन
२. नगर विकास
३. माहिती व तंत्रज्ञान
४. माहिती व जनसंपर्क
५. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प)
६. परिवहन
७. पणन
८. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
९. मदत व पुनर्वसन
१०. आपत्ती व्यवस्थापन
११. मृद व जलसंधारण
१२. पर्यावरण व वातावरणीय बदल
१३. अल्पसंख्याक व औकाफ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कोणती खाती?
१. गृह
२. वित्त व नियोजन
३. विधी व न्याय
४. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
५. गृहनिर्माण
६. ऊर्जा
७. राजशिष्टाचार
हेही वाचा : आगामी सर्व निवडणुका भाजपा आणि शिवसेना युतीत लढविणार – एकनाथ शिंदे
शिंदे गटातील मंत्र्यांकडे कोणती खाती?
१. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता
२. दादा भुसे – बंदरे व खनिकर्म
३. संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन
४. संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन
५. उदय सामंत – उद्योग
६. तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण<br>७. अब्दुल सत्तार – कृषी