मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. लोकसभेची निवडणूक पुढच्या महिन्यातल्या १९ तारखेपासून १ जूनपर्यंत चालणार आहे. महराष्ट्रात पाच तर देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळीही सुरु झाली आहे. अशात स्टार प्रचारक म्हणून एकनाथ शिंदे यांनी ४० नावं जाहीर केली आहेत. मात्र यात एक नाव नसल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. कोण आहेत शिवसेनेचे स्टार प्रचारक? १) नरेंद्र मोदी२) अमित शाह३) एकनाथ शिंदे४) नितीन गडकरी५) जे. पी. नड्डा६) रामदास आठवले७) देवेंद्र फडणवीस८) अजित पवार९) महादेव जानकर१०) जोगेंद्र कवाडे११) रामदास कदम१२) गजानन किर्तीकर१३) चंद्रशेखर बावनकुळे१४) आनंदराव अडसूळ१५) प्रफुल्ल पटेल१६) मिलिंद देवरा१७) गुलाबराव पाटील१८) नीलम गोऱ्हे१९) मीना कांबळी२०) श्रीकांत शिंदे२१) उदय सामंत२२) शंभूराज देसाई२३) दीपक केसरकर२४) अब्दुल सत्तार२५) तानाजी सावंत२६) संदिपान भुमरे२७) दादा भुसे२८) संजय राठोड२९) भरत गोगावले३०) दीपक सावंत३१) संजय गायकवाड३२) संजय शिरसाट३३) शहाजी बापू पाटील३४) मनिषा कायंदे३५) नरेश म्हस्के३६) ज्योती वाघमारे३७) राहुल लोंढे३८) कृपाल तुमाणे३९) आशिष जैस्वाल४०) किरण पांडव स्टार प्रचारकांच्या यादीत दिग्गज नावं ही चाळीस नावं या यादीत आहेत. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक महत्त्वाची नावं या यादीत आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे यात शंकाच नाही. अशात या यादीत एक महत्त्वाचं नाव नाही. त्याचीही चर्चा रंगली आहे. हे ही वाचा- Lok Sabha Election: भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी, मोदी, शाह, फडणवीस यांच्यासह ४० नावं राहुल शेवाळेंचं नाव यादीत का नाही? राहुल शेवाळे यांचं नाव या यादीत का नाही? याची चर्चा आता रंगली आहे. शिवसेनेच्या लोकसभेतले प्रमुख नेते म्हणजे राहुल शेवाळे. मात्र स्टार प्रचारकांच्या या यादीत त्यांचं नाव नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहे आणि अनेकांच्या यादीमुळे भुवया उंचावल्या आहेत. अशात राहुल शेवाळे यांच्या नावाची वेगळी घोषणा स्टार प्रचारक म्हणून केली जाऊ शकते. मात्र सध्या तरी या यादीत त्यांचं नाव नसल्यानेच विविध चर्चा रंगल्या आहेत.