scorecardresearch

Premium

महाड MIDC स्फोट: मृतांची संख्या ७ वर, अद्याप ४ जण बेपत्ता; घटनास्थळी NDRF चं शोधकार्य चालू!

महाड एमआयडीसीतील एका कंपनीत झालेल्या स्फोटानंत NDRF नं शोधकार्य चालू केलं आहे. ७ जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप ४ जण बेपत्ता आहेत.

mahad midc blast ndrf
महाड एमआयडीसी स्फोट प्रकरणी चौकशीचे आदेश

महाड औद्योगिक वसाहतीतल्या ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत शुक्रवारी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात एकूण ११ जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. एनडीआरएफची पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अद्याप शुक्रवारी रात्रभर शोधकार्य चालू होतं. आज सकाळपर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. मात्र, अद्याप ४ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट घेऊन अपघात प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

उद्योगमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी

उद्योगमंत्री उदय सामंत पहाटे साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन देखील केलं.

The domestic capital market overtook Hong Kong capital market to rank fourth
विश्लेषण: भारतीय भांडवली बाजाराची जगात चौथ्या स्थानी झेप कशी?
profit recovery in the IT sector Sensex fell by 359 degrees
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नफावसुली; ‘सेन्सेक्स’मध्ये ३५९ अंशांची घसरण
Clubfoot Clinic Vidarbha AIIMS
विदर्भातील पहिले शासकीय क्लबफूट क्लिनिक ‘एम्स’मध्ये; शारीरिक व्यंग असलेल्या बालकांवर उपचार
Mumbai Diamond Industry Surat Diamond Bourse
हिरे उद्योगातील प्रमुख किरण जेम्सचे पुन्हा मुंबईत स्थलांतर; कंपनीची मालकी, संस्थापक अन् आर्थिक कामगिरीबद्दल जाणून घ्या

अपघाताच्या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश आपण दिल्याचं यावेळी उदय सामंत यानी सांगितलं. चौकशीनंतर अपघातामागचं कारण स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.

महाडमध्ये आगीत सात जखमी, ११ बेपत्ता; एमआयडीसीतील दुर्घटना

महाडमध्ये NDRF चा बेसकॅम्प

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू, असं आश्वासन यावेळी उदय सामंत यांनी दिलं. महाडमध्ये NDRF च्या कॅम्पची उभारणी करण्याच्या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी मिळाली असून त्यासाठीही राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे भविष्यात पुण्याहून एनडीआरएफचं पथक बोलावण्याची वेळ येणार नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahad midc blast case ndrf search operation on uday samant orders inquiry pmw

First published on: 04-11-2023 at 08:07 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

×