विविध आजारांवर दिव्य मंत्रांनी दैविक प्रार्थना असा उल्लेख असलेला कोल्हापुरातील महालक्ष्मी महाउत्सव वादात सापडला आहे. याबाबत सामाजिक संस्थांनी तक्रारी केल्यानंतर महापालिकेने अवास्तव दाव्याबाबत खुलासा करण्याचे आदेश संयोजकांना दिले आहेत.

हेही वाचा- ‘श्वास घ्यायला त्रास अन् नाकात ऑक्सिजन नळी’, भाजपाच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट मैदानात

कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी महालक्ष्मी महाउत्सव या आशयाचे मोठे फलक तसेच रिक्षांवर पोस्टर्स लावण्यात आले आहेत. २६ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान श्री कृष्णगिरी पार्श्व पद्मावती सेवा ट्रस्ट महाराष्ट्र शाखा यांच्यावतीने होणाऱ्या कार्यक्रमतील ‘ विविध आजारांवर दिव्य मंत्रांनी दैविक प्रार्थना’ या उल्लेखास कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष वकील बाबा इंदुलकर, प्रजासत्ताक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा- आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार का? उज्ज्वल निकम म्हणाले…

तर कायदेशीर गुन्हा

कार्यक्रमाबाबत महापालिका व पोलीस यांची परवानगी प्रत निदर्शनास येत नाही. जाहिरातीचे अवलोकन केले असता त्यामधून आपल्या मार्फत आरोग्यविषयक चुकीचे अशास्त्रीय पद्धतीने वैद्यकीय उपचाराविषयी जाहिरातबाजी करणे कायदेशीर गुन्हा होऊ शकतो, असे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजक सुजित मंडलेचा यांना पाठवलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवस्थान समितीचा संबंध नाही

फलकावर श्री कोल्हापूर महालक्ष्मी असा उल्लेख केल्याने भाविक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे विचारणा करीत आहेत. ‘ या कार्यक्रमाचा देवस्थान समिती, महालक्ष्मी मंदिर बाबत कसलाही संबंध नाही. नावात साम्य ठेवून इतर संस्था हे कार्यक्रमकरीत आहेत ‘, असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले. देवस्थान समितीच्या विधीज्ञांशी चर्चा करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा विचार असल्याचेही त्यांनी नमूद केले.