चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने मंगळवारी रात्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव सोहळा अपूर्व उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या वेळी प्रदक्षिणा मार्गावर काढण्यात आलेल्या आकर्षक रांगोळय़ा, फुलांच्या पायघडय़ा आणि नयनरम्य आतषबाजीमुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा सोमवारी पार पडली. या यात्रेच्या दुस-या दिवशी म्हणजेच मंगळवारी महालक्ष्मी देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला. या सोहळय़ासाठी चांदीचा रथ केला असल्याने या सोहळय़ाला आणखी महत्त्व प्राप्त झाले होते. रथोत्सवाच्या प्रारंभी तोफेची सलामी देण्यात आली. त्यानंतर पोलीस बँडपथक, पारंपरिक वाद्यांच्या निनादात रथोत्सवाला प्रारंभ झाला. रथोत्सवाच्या निमित्ताने न्यू गुजरी मित्रमंडळाने मार्गावर कलात्मक रांगोळय़ा घातल्या होत्या. तसेच लाईट इफेक्ट्स, ढोलपथक हे रथोत्सव सोहळय़ाचे आकर्षण ठरले. पारंपरिक वेशभूषेतील सुवासिनींच्या उपस्थितीत रथाचे स्वागत करण्यात आले. पुढे अनेक भाविकांनी रथोत्सवात सहभागी होऊन रथ ओढला. या वेळी ‘होम मिनिस्टर फेम’ अभिनेता आदेश बांदेकर यांनी या सोहळय़ास खास उपस्थिती लावून रथही ओढला. फटाक्यांची आतषबाजी आणि उपस्थितांकडून अंबा मातेचा अखंड गजर यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
महाद्वार रोड, गुजरी कॉर्नर चौकात महालक्ष्मी देवी आणि बालाजीची भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. मंडळातर्फे यंदा पुण्याच्या नादब्रह्म ढोलपथकाला आमंत्रित करण्यात आले होते. महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरून प्रदक्षिणा घालून मध्यरात्री रथ पुन्हा मंदिरात आला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2014 रोजी प्रकाशित
महालक्ष्मीचा रथोत्सव करवीरनगरीत उत्साहात
चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने मंगळवारी रात्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव सोहळा अपूर्व उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या वेळी प्रदक्षिणा मार्गावर काढण्यात आलेल्या आकर्षक रांगोळय़ा, फुलांच्या पायघडय़ा आणि नयनरम्य आतषबाजीमुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
First published on: 17-04-2014 at 04:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahalaxmi rathotsava celebrated in enthusiasm