महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा ज्वर वाढू लागला आहे. दोन आघाड्या आणि सहा प्रमुख पक्षांबरोबरच ही निवडणूक तिरंगी, चौरंगी किंवा बहुरंगी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येकाकडून निवडणूक जिंकण्याचा आणि सत्तेत येण्याचा दावा केला जातोय. आपणही अनेकदा राजकीय घडामोडींचे आडाखे बांधत असतो. जर तुम्हालाही राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या राजकारणाचा गाढा अभ्यास असेल, तर मग हे क्विझ फक्त तुमच्यासाठी आहे!

निवडणूक क्विझ क्रमांक एक – ८ नोव्हेंबर

या क्विझमध्ये तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी फक्त पाच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यावर तुम्हाला स्मार्टफोनसारखं आकर्षक बक्षिस जिंकण्याची मोठी संधी आहे. स्मार्टफोनबरोबरच इतरही आकर्षक बक्षिसांचे तुम्ही दावेदार ठरू शकता. राजकारण्यांप्रमाणेच तुम्हालाही तुमचाच विजय होईल असं वाटत असेल, तर मग लगेच सुरू करा. वर क्विझची लिंक आहे, त्यावर क्लिक करा आणि प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात करा! या क्विझमध्ये निवडणुकीशी संबधित ५ प्रश्न आहेत. त्यासोबत दिलेल्या पर्यायांमधून तुम्हाला एका योग्य पर्यायाची निवड करायची आहे.

निवडणूक क्विझ क्रमांक २ – १४ नोव्हेंबर

१४ नोव्हेंबरची क्विझ तुम्ही खेळला असाल तर तुम्हाला आता २१ नोव्हेंबरचं क्विझ खेळायचं आहे. तब्बल ११ निवडणुका एकाच पक्षातून निवडून जाण्याचा विक्रम कोणत्या आमदाराने केला? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. मग वाट कसली पाहाता.. चला उचला मोबाइल आणि क्विझची उत्तरं पटापट सोडवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक क्विझ क्रमांक ३ – २१ नोव्हेंबर

महाराष्ट्रात काय आहे विधानसभा निवडणुकीचं गणित?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष हे तीन सत्ताधारी पक्ष महायुतीमध्ये आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे तीन प्रमुख पक्ष विरोधातील महाविकास आघाडीमध्ये आहेत. यांच्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी व इतर अपक्षांकडूनही निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अवघ्या २८८ जागांसाठी काही हजार उमेदवार रिंगणात उतरले आहेत!