महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान ईडीने असा आरोप केला आहे की, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये मुंबईच्या काही पब्स, बारच्या मालकांकडून चार कोटीहून अधिक वसुली केली. ईडीच्या म्हणण्यानुसार वाझेने देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना हे पैसे दिले. त्यानंतर ह्या पैश्यातला एक वाटा दिल्लीतल्या चार शेल कंपन्यांच्या माध्यमातून नागपूरातल्या एका चॅरिटेबल ट्रस्टकडे वळवण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील बार, पब यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४.७० कोटी रुपयांपैकी ३.१८ कोटी रुपये देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेशच्या माध्यमातून नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट या संस्थेत फिरवले. संस्थेत देणगी स्वरुपात ही रक्कम जमा झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी आधी ही रक्कम दिल्लीतील दोन व्यक्तींना हवालाद्वारे पोच केली गेली.

हेही वाचा- अनिल देशमुख यांच्या दोन सहायकांना अटक

नंतर या दोन व्यक्तींच्या नावे नोंद बोगस कंपन्यांच्या खात्यातून ही रक्कम संस्थेत वळविण्यात आल्याचा दावा शनिवारी ईडीने विशेष न्यायालयात केला. या व्यवहारांमध्ये देशमुख यांचा स्वीय सहायक कुंदन शिंदे प्रत्यक्ष सहभागी असल्याचेही एनआयएने न्यायालयाला सांगितले.

सचिन वाझे यांनी दिलेल्या जबाबात देशमुख यांनी काही प्रकरणांच्या तपासाबाबत थेट सूचना दिल्याचे सांगितले. तसेच एका बैठकीत देशमुख यांनी शहरातील बार, पब आदी आस्थापनांकडून महिन्याकाठी तीन लाख रुपये गोळा करण्यासही सांगितले. त्यासाठी शहरातील बार मालकांची बैठक घेतली. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दक्षिण, मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांतील ऑर्केस्ट्रा बारकडून एक कोटी ६४ तर पश्चिम उपनगरांतील आस्थापनांकडून दोन कोटी ६६ लाख रुपये गोळा केले.

त्याशिवाय गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात जया पुजारी आणि महेश शेट्टी या बार मालकांनी इतरांच्यावतीने ४० लाख रुपये ‘गुड लक’ म्हणून दिले होते. ही सर्व रक्कम देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्या हवाली केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra former home minister anil deshmukh ed enquiry 4 crores transferred to a trust vsk
First published on: 27-06-2021 at 10:18 IST