scorecardresearch

Maharashtra News Updates : आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले : एकनाथ शिंदे; जाणून घ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!

Maharashtra- Mumbai Rain Updates : महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Latest Marathi News Today
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट

Mumbai Monsoon Weather Live Updates in Marathi : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर विधानसभेत सोमवारी झालेल्या बहुमत चाचणीनंतर पडदा पडला आहे. अधिवेशनातील घडामोडींवर आता राज्यातील राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे पावसानं महाराष्ट्राच्या काही भागात दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी निर्माण होउ शकणाऱ्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रसासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

Live Updates

Maharashtra Live Updates 05 July 2022 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

19:18 (IST) 5 Jul 2022
मध्यावधी निवडणुकीबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला, म्हणाले…

भाजपा आणि शिंदे गटाने एकत्रित येत राज्यात नवीन सरकार स्थापन केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यानी त्यांचं स्वागत केले. यांनतर चंद्रकांत पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मध्यावधी निवडणुकीबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानावर खोचक टोला लगावला आहे. सविस्तर बातमी

19:10 (IST) 5 Jul 2022
सत्तास्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे विरुद्ध शेलार; कारण ठरलं मुंबईतील नालेसफाई, मुख्यमंत्री म्हणाले…

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मागील काळात मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामांवर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, मंगळवारी (५ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आरोपांवर विचारलं असता त्यांनी मी वॉर रुमच्या लाईव्ह कॅमेरातून बघितल्याचं सांगत नालेसफाई झाल्याचं मत व्यक्त केलं. नालसफाई झाली असल्यानेच पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी पाणी तुंबलं नाही, असंही त्यांनी नमूद केलं. यानंतर शेलार आणि शिंदे यांच्या विरोधाभासी प्रतिक्रियेंची जोरदार चर्चा आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी…

18:13 (IST) 5 Jul 2022
वर्धा : मुसळधारेने पूल कोसळला, सहा गावांचा संपर्क तुटला

देवळी शहराशी संपर्काचे माध्यम असलेला यशोदा नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे कोसळला. परिणामी, सहा गावांचा संपर्क तुटला आहे.देवळी डिगडोह मार्गावर यशोदा नदीवरील रस्त्यात छोटा पूल आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. देवळी येथेही असाच पाऊस झाल्याने बरीच पडझड झाली.

सविस्तर वाचा

17:50 (IST) 5 Jul 2022
बीएसटी आणि एसटीच्या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी सूचना – एकनाथ शिंदे

मुंबई लोकल रेल्वेच्या २५ ठिकाणी पाणी साठल्याने रेल्वे ठप्प होते. त्या ठिकाणी बीएमसी आयुक्तांना अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास सांगितले आहे. त्याशिवाय जेथे पाणी साठते त्या ठिकाणी बीएसटी आणि एसटीच्या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी सूचना केल्या आहेत. यामुळे कामासाठी प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांना अधिकचा आर्थिक बार सोसावा लागणार नाही – एकनाथ शिंदे

17:40 (IST) 5 Jul 2022
आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील पावसाचा आढावा घेत प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. दरड कोसळण्याची शक्यता आहे या भागातील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली.

16:38 (IST) 5 Jul 2022
वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची चाकूने भोसकून हत्या

वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली आहे. ‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाकमधील हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हुबळी जिल्ह्यात ही घटना घडली असून यानंतर एकच खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर गुरुजी कामानिमित्त हॉटेलमध्ये आले होते असा पोलिसांचा अंदाज आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1544270620803747841

15:48 (IST) 5 Jul 2022
पुढील पाच दिवस पावसाचे ; मुंबईत सतर्कतेचा इशारा

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईतील विविध ठिकाणचे सखलभाग जलमय झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. घरात पाण्याचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. तर पाणी साचल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरील वाहतूक कोलमडली, पाण्याखाली रेल्वे रूळ लूप्त झाल्याने लोकलचा वेग मंदावला.

सविस्तर वाचा

15:22 (IST) 5 Jul 2022
ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळताच कल्याण-शीळफाटा, माणकोली पूल मार्गी लावा ; समाज माध्यमांवर नेटकऱ्यांची जोरदार चर्चा

मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर नेटकऱ्यांनी समाज माध्यमावर मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन करण्या बरोबरच कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सुरू असलेले रस्ते, पुलांचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा

15:21 (IST) 5 Jul 2022
ठाण्यातील श्रीरंग आणि वृंदावनवासियांची ‘तुंबई’तून सुटका ; पालिकेने उभारल्या चार ठिकाणी नवी यंत्रणा

शहरातील खाडीलगत असलेल्या वृंदावन आणि श्रीरंग वसाहतींच्या परिसरात समुद्र भरतीच्या वेळेत मुसळधार पाऊस झाल्यास गुडघाभर पाणी साचत असल्याचे प्रकार दरवर्षी दिसून येतो. या परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चार ठिकाणी यंत्रणा उभारण्यात आली असून या नव्या उपाययोजनेमुळे सोमवारी भरतीच्या वेळेत मुसळधार पाऊस होऊनही या परिसरात अजिबात पाणी साचले नसल्याचे चित्र दिसून आले.

सविस्तर वाचा

14:48 (IST) 5 Jul 2022
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपराजधानीमध्ये जोरदार स्वागत

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंगळवारी नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. विमानतळावर स्वागत केल्यानंतर वर्धामार्गावरील हेडगेवार स्मारकाजवळ त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

सविस्तर वाचा

14:29 (IST) 5 Jul 2022
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांना पकडले ; नागरिकांच्या तत्परतेमुळे चोरटे गजाआड

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पीएमपी थांब्यावर तरुणाचा मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना नागरिकांनी पाठलाग करुन पकडले.या प्रकरणी मधु व्यंकय्या (वय ५५), पी. प्रेमकुमार ब्रम्हेय्या (वय २३), पी धनराज कन्हैया (वय २९, तिघे मूळ रा. ग्रीन पार्क, हैद्राबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सविस्तर वाचा

14:03 (IST) 5 Jul 2022
सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांवर ओढलेल्या ताशेऱ्यांविरोधात देशातील ११९ मान्यवरांचं पत्र

मोहम्मद प्रेषितांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सुप्रीम कोर्टाने भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना कठोर शब्दांमध्ये फटकारल्यानंतर आता त्यांना समर्थन मिळताना दिसत आहे. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांवर ओढलेल्या ताशेऱ्यांविरोधात ११९ मान्यवरांनी पत्र प्रसिद्ध करत टीका केली आहे. यामध्ये १५ निवृत्त न्यायाधीश, ७७ निवृत्त नोकरशहा आणि ५२ निवृत्त लष्कर अधिकारी आहेत. सुप्रीम कोर्टाने ओढलेले ताशेरे अपमानकारक असल्याचं या मान्यवरांनी म्हटलं आहे.

सविस्तर बातमी

13:58 (IST) 5 Jul 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ठाण्याच्या भाजपा कार्यालयाला भेट ; सदिच्छा भेटीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण

शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपने एकत्रित येऊन नवे सरकार स्थापन केल्याने शिंदे गटाचे पुढे काय होणार अशी चर्चा सुरु असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री ठाण्यातील भाजपा कार्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

सविस्तर वाचा

12:39 (IST) 5 Jul 2022
“पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”; उदयपूरच्या हत्येचा उल्लेख करत संजय राऊतांचं ट्वीट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचं म्हणत पुणे पोलिसांकडे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केलीय. संजय राऊत यांनी ट्वीट करत यावर आपली भूमिका मांडली. या ट्वीटमध्ये त्यांनी राजस्थानमधील उदयपूरमध्ये ज्या प्रकारे हत्याकांड झालं त्याचाही उल्लेख केला. राऊतांच्या या ट्वीटवर आता पुणे पोलीस काय पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

सविस्तर बातमी…

12:38 (IST) 5 Jul 2022
उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था म्हणणाऱ्या गुलाबरावांना राऊतांचं उत्तर, म्हणाले “ते काही दुधखुळे…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना जोरदार उत्तर दिलंय. “बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच ते कालपर्यंत सत्तेत होते. उद्धव ठाकरे काही दुधखळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (५ जुलै) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी…

12:20 (IST) 5 Jul 2022
विश्लेषण: शिंदे गटाने आमदारांच्या अपात्रतेसाठी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंचं नाव का नाही?

राज्यात सध्या शिवसेना नेमकी कोणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु आहे. त्यातच विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाने विश्वासमताच्या विरोधात मतदान करणाऱ्या उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेच्या १४ आमदारांविरोधात कारवाई सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी या १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाईची करण्यात यावी अशी याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. मात्र आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलं आहे. काय आहे यामागील कारण? जाणून घ्या

सविस्तर बातमी

12:19 (IST) 5 Jul 2022
फडणवीस देवमाणूस! नागपुरात जंगी स्वागत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपद आलं आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच ते नागपुरात दाखल झाले. पक्षासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच नागपुरात स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. यावेळी फडणवीसांनी याच प्रेमामुळे आपण यशस्वी आहोत अशी भावनाही व्यक्त केली.

सविस्तर बातमी

11:24 (IST) 5 Jul 2022
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून कोकणपट्ट्यात अतिवृष्टी होत आहे. तर, मुंबई, ठाणे भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील दोन – तीन तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.

सविस्तर वाचा

11:24 (IST) 5 Jul 2022
मुंबई, कोकणातील कोसळधार मध्य महाराष्ट्रातही बसरणार; कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकमध्येही वाढणार पावसाचा जोर

मुंबईसह ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून सर्वत्र सुरु असणाऱ्या मुसळधार पाऊसाचा जोर येत्या काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवार दुपारपासूनच या भागामध्ये पवासाचा जोर सुरु असून मंगळवारी सकाळीही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय.

https://twitter.com/LoksattaLive/status/1544197265468051457

येथे वाचा सविस्तर वृत्त

11:03 (IST) 5 Jul 2022
पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा; एकनाथ शिंदेंचे निर्देश

हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होण्याची भीती आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना तसंच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

वाचा सविस्तर

Maharashtra News Live Updates Today

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट

Maharashtra Live Updates 05 July 2022 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

Web Title: Maharashtra live updates 05 july 2022 eknath shinde balasahebs hindutva mumbai rain updates cbse board result