Maharashtra Monsoon Session 2025 Updates, 18 July : महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विधीमंडळात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. तसेच गुरुवारी (१७ जुलै) विधीमंडळ परिसरात आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. आज अधिवेशनात याच मुद्द्याभोवती चर्चा होताना दिसत आहे. यासंबंधीच्या बातम्यांच्या आढावा आपण घेणार आहोत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. यावरून रायकीय वर्तुळातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. यासह सर्व सामाजिक, राजकीय व स्थानिक बातम्यांच्या आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्रातील व देशभरातील महत्त्वाच्या सामाजिक व राजकीय बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

22:07 (IST) 18 Jul 2025

"राज ठाकरेंसारख्या अभ्यासू नेत्यानेही तीच रिऽऽ ओढावी हे दुर्दैवीच…!" भाजपाची मनसे अध्यक्षांच्या सभेवर पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : "मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी...", भाजपा प्रवक्ते राज ठाकरेंच्या सभेबद्दल काय म्हणाले? ...वाचा सविस्तर
21:17 (IST) 18 Jul 2025

"पूर्वी मी धारावीतून जोडे, बॅग घ्यायचो", मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य; म्हणाले, "२०१४ नंतर मी मोठ्या…"

CM Devendra Fadnavis on Dharavi Development : "जोडे, बॅग १० टक्के किमतीत...", देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ...अधिक वाचा
21:06 (IST) 18 Jul 2025

"सरकार गोष्टी लादणार असेल तर...", राज ठाकरे हिंदीच्या सक्तीच्या मुद्यांवरून आक्रमक

"मराठी माणूस, मराठी भाषा याबाबतीत राज ठाकरे कोणाशीही तडजोड करणार नाही. तुम्हीही तसंच जगलं, वावरलं पाहिजे. जे कोणी अमराठी लोक राहत असतील त्यांनी लवकरात लवकर मराठी शिकावं. तुम्हा सर्वांना सांगणं आहे- ट्रेन-बस- टॅक्सी कायमस्वरुपी तुम्ही समोरच्याशी मराठीतच बोला. त्याला मराठीत बोलायला भाग पाडा. सरकार गोष्टी लादणार असेल तर यांची हिंमत वाढणार. तुमची सत्ता विधानसभेत, लोकसभेत आहे. आमची सत्ता रस्त्यावर आहे. ५६ इंचाची छाती तुम्हीपण बाहेर काढून फिरा. हा महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे. महाराष्ट्रात कोणी वेडवाकडं वागेल तर मनसैनिक त्या माणसाचं गाल आणि चेहरा यांची युती झाल्याशिवाय राहणार नाही", असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

20:43 (IST) 18 Jul 2025

"महाराष्ट्रातल्या नेत्यांपेक्षा माझं हिंदी बरं...", राज ठाकरे काय म्हणाले?

"महाराष्ट्रातल्या नेत्यांपेक्षा माझं हिंदी बरं आहे. माझ्या वडिलांना व्याकरणासकट मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू येत होतं. भाषा कोणतीही वाईट नसते. हिंदी वाईट भाषा नाही. आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार जा. लहान मुलांवर तर नाहीच नाही. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे. हिंदुत्वाच्या बुरख्याकडून माझी मराठी संपवायला येणार असाल, माझ्यासारखा कडवट मराठी सापडणार देखील नाही. हिंमत असेल तर हात लावून दाखवा. हे सगळं षडयंत्र समजून घेतलं पाहिजे. मुंबईला हात लावायचा असेल, मीरा भायंदर, पालघरपर्यंतचे मतदारसंघ अमराठी करायचे आहेत. हे मतदारसंघ तयार करून तुम्हाला लांब पाठवणार. आमचेचे नेते, आमचेच महापौर. हा अख्खाच्या अख्खा पट्टा गुजरातला जोडण्याचे खटाटोप सुरू आहेत. हे आजचं नाहीये, पूर्वी त्यांनी जाहीररीत्या सांगितलं होतं. आता हळूवार पद्धतीने सांगितलं होतं. ज्या पद्धतीने अंगावर येतात, मराठी बोलणार नाही हा माज सहज आलेला नाही. हा माज तिथून आला आहे. मी लंबंचौडं भाषण करण्यासाठी आलेलो नाही", असं राज ठाकरे म्हणाले.

20:30 (IST) 18 Jul 2025

"हिंदीसक्तीसाठी कोण दबाव टाकतंय तुमच्यावर?", राज ठाकरे

"हिंदीसक्तीसाठी कोण दबाव टाकतंय तुमच्यावर? केंद्राचं हे पूर्वीपासूनचं आहे. काँग्रेस असल्यापासूनचं आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड लढा दिला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव होता. काही गुजराती व्यापाऱ्यांचा डाव होता. आचार्य अत्रेंचं पुस्तक वाचत होतो. वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका. देशाचे माजी गृहमंत्री आम्हाला आदरणीय होते. मोरारजी देसाई यांनी मराठी माणसावर गोळीबार केला होता",राज ठाकरे म्हणाले.

20:30 (IST) 18 Jul 2025

"हे कसले हिंदी चॅनलवाले? सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहेत", असं राज ठाकरे

"यांचा मुंबईवर डोळा आहे अनेक वर्ष. ते चाचपडून बघत आहेत. हिंदी भाषा आणली, बघूया महाराष्ट्र विरोध करतोय का. मराठी माणूस बोलतोय का. तो शांत दिसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. मुंबई ताब्यात घ्यायची आणि गुजरातला द्यायचा हा त्यांचा डाव आहे. विषय भाषेचा आहे. जगातलं सत्य. तुमची भाषा आणि जमीन गेली की तुम्हाला काहीही अर्थ नाही. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणं महत्त्वाचं आहे. तुमची जमीन राखणं महत्त्वाचं आहे. मुंबईत काही गोष्ट झाली की हिंदी चॅनलवाले देशभर चालू ठेवतात. हे कसले हिंदी चॅनलवाले? सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहेत", असं राज ठाकरे म्हणाले.

20:29 (IST) 18 Jul 2025

दुकानं नाही, शाळाच बंद करेन : राज ठाकरे

"हिंदी भाषा पहिलीपासून शिकली पाहिजे म्हणे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की तिसरी भाषा हिंदी करणार म्हणजे करणार. मोर्च्याच्या धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागणार होता. तुम्हाला आत्महत्या करायची असेल तर करा. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून पाहा. दुकानं नाही, शाळाच बंद करेन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय?", असं राज ठाकरे म्हणाले.

20:16 (IST) 18 Jul 2025

हिंदी सक्ती करून बघाच! राज ठाकरेंचं फडणवीसांना जाहीर आव्हान

हिंदी भाषा पहिलीपासून शिकली पाहिजे म्हणे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की तिसरी भाषा हिंदी करणार म्हणजे करणार. मोर्च्याच्या धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागणार होता. तुम्हाला आत्महत्या करायची असेल तर करा. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून पाहा. दुकानं नाही, शाळाच बंद करेन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय?

20:11 (IST) 18 Jul 2025

"मी काय बोलतोय ते माणसांना समजत नाहीये, घोड्यांना काय समजणार?", राज ठाकरे कार्यकर्त्यांवर संतापले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिरा भाईंदरमध्ये जाहीर सभा पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे काही कार्यकर्त्यांवर संतापले. ते म्हणाले की, इथे मी काय बोलतोय ते माणसांना समजत नाहीये, घोड्यांना काय समजणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. कार्यक्रमात घोडे पाहिल्यावर राज ठाकरे चांगलेच संतपाले.

20:10 (IST) 18 Jul 2025

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिरा भाईंदरमध्ये जाहीर सभा पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे काही कार्यकर्त्यांवर संतापले. ते म्हणाले की, इथे मी काय बोलतोय ते माणसांना समजत नाहीये, घोड्यांना काय समजणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. कार्यक्रमात घोडे पाहिल्यावर राज ठाकरे चांगलेच संतपाले.

20:06 (IST) 18 Jul 2025

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडत आहे. पण ध्वनीक्षेपक यंत्रणा सदोष असल्यामुळे भाषण सुरू होण्यास काहीसा विलंब झाला.

19:19 (IST) 18 Jul 2025

"गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार, २२ बारबालांवर कारवाई", अनिल परबांची विधान परिषदेतून कदमांच्या राजीनाम्याची मागणी

Anil Parab vs Yogesh Kadam : एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? असा संतप्त सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. ...वाचा सविस्तर
18:20 (IST) 18 Jul 2025

पक्षी मृत्यूप्रकरणी गृहसंकुलाच्या अध्यक्ष-सचिवांवर गुन्हा दाखल; जखमी पक्ष्यांपैकी आणखी ५ पक्ष्यांचा मृत्यू

घोडबंदर येथील आनंदनगर भागात ऋतू एनक्लेव्ह या गृहसंकुलाजवळील वृक्षांच्या फांदी छाटणी दरम्यान गुरूवारी ४५ पक्ष्यांच्या मृत्यु झाला होता. ...सविस्तर वाचा
18:19 (IST) 18 Jul 2025

न्यू माहीम शाळा बंद प्रकरण : पालकांसोबत आता मराठी भाषा केंद्राचाही विरोध...

माहीम येथील मुंबई महानगरपालिकेची न्यू माहीम शाळा इमारत धोकादायक असल्याचे कारण पुढे करून पालिका प्रशासनाकडून ती बंद केली असून लवकरच शाळेचे पाडकाम करण्यात येणार आहे. ...अधिक वाचा
18:09 (IST) 18 Jul 2025

राज ठाकरेंबरोबर राजकारणात युती करण्याबद्दल उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले, "आता कोणतीही…"

Uddhav Thackeray on Political Alliance with Brother Raj Thackeray : उद्धव ठाकरे राज ठाकरे राजकारणात एकत्र येणार का? ...सविस्तर बातमी
18:06 (IST) 18 Jul 2025

Video : मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येची पुन्हा चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा...

ठाण्यातील राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ...सविस्तर बातमी
17:49 (IST) 18 Jul 2025

सहा मेट्रो मार्गिकांना अर्थबळ, प्रकल्पांसाठी कर्ज हमी मंजूर; आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधी उभारण्याचा मार्ग मोकळा

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध करून देत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणले जात आहे. ...सविस्तर बातमी
17:44 (IST) 18 Jul 2025

टकले आणि नितीन देशमुख सराईत : पोलिसांचा युक्तीवाद

विधान भवन परिसरात गुरुवारी (१७ जुलै) झालेल्या राड्यानंतर राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख हे सराईत गुन्हेगार असल्याचा सांगत दोन्ही गटांनी कट रचल्याचा युक्तीवाद पोलिसांनी केला आहे. या दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

17:37 (IST) 18 Jul 2025

"गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार, २२ बारबाला पकडल्या", अनिल परबांचा खळबळजनक आरोप

शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीत सावली नावाचा डान्सबार आहे. पोलिसांनी अलीकडेच या बारवर धाड टाकून २२ बारबालांना ताब्यात घेतलं होतं. "डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे?" असा प्रश्न देखील अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.

परब म्हणाले, कांदिवलीत सावली बार अँड रेस्टॉरंटवर ३० मे २०२५ ला समता नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी यावेळी २२ गिऱ्हाइक आणि बारबालांना पकडलं. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दाखल एफआयआर कॉपी वाचली. तेव्हा लक्षात आलं की या बारचं परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहराज्यमंत्र्यांच्या आई आहेत. त्यामुळे सरकारने योगेश कदमांचा तातडीने राजीनामा घ्यावा.

17:26 (IST) 18 Jul 2025

पतीशी शारीरिक संबंध नाकारणे, विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेणे क्रौर्यच…दोन्ही कारणे घटस्फोटासाठीचे आधार...

पतीशी शारीरिक संबंध नाकारणे आणि त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेणे हे क्रौर्यच आहे. तसेच, दोन्ही घटस्फोट मागण्याची कारण असू शकते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. ...सविस्तर वाचा
17:18 (IST) 18 Jul 2025

पालिका मुख्यालयातच कंत्राटदारांचा तुफान राडा; दोन जण जखमी, एकमेकांविरूद्ध गुन्हे दाखल

गुरूवारी अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत फेरिवाला धोरण जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जात होती. त्यामुळे पालिकेत पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी काही कंत्राटदार आणि त्यांचे काही सहकारी उपस्थित होते. ...सविस्तर बातमी
17:13 (IST) 18 Jul 2025

२०२९ पर्यंत राज्यातील वीजेचे दर कमी होतील : मुख्यमंत्री

२०३० पर्यंत राज्यातील ५० टक्के वीज ही हरीतनिर्मिती असेल.

दोन वर्षांमध्ये ४५ हजार मेगावॅट वीजनिर्मिती वाढेल.

२०३० साली आपली गरज ही ८२ हजार मेगावॅट वीजेची असेल. त्यातील ४५ हजार मेगावॅट हरीत असेल.

२०२९ पर्यंत वीजदर दरवर्षी कमी होतील. घरगुती वीजेचे दर ८.२ रुपयांवरून ६ रुपयांवर येतील.

17:08 (IST) 18 Jul 2025

डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह परिसरात वाहने उभे करण्यासाठी नवे नियम

गेल्याकाही दिवसांपासून या चौक परिसरात होणाऱ्या वाहतुक कोंडींमुळे नागरिक त्रस्त आहेत. ...अधिक वाचा
16:55 (IST) 18 Jul 2025

ठाण्यात टप्प्याटप्प्याने टोईंग सुरु

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात रस्त्याकडेला बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या दुचाकींवर ठाणे पोलिसांकडून टोईंग वाहनांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. ...सविस्तर बातमी
16:54 (IST) 18 Jul 2025

अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामाची प्रतीक्षाच; ६८५ बांधकामे हटविण्याचे झोपु प्राधिकरणासमोर आव्हान…

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने घाटकोपरमधील चिरानगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला. मात्र अद्याप या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. ...सविस्तर बातमी
16:49 (IST) 18 Jul 2025

पडळकर-आव्हाड राड्याचे सभागृहात पडसाद, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून मोठी कारवाई

Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar : विधिमंडळ परिसरात अधिवेशन काळात विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक आणि शासकीय कर्मचारी यांनाच प्रवेश असेल असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. ...सविस्तर वाचा
16:49 (IST) 18 Jul 2025

कुलाबा- मेट्रो ३ला आणखी तीन महिन्यांची प्रतीक्षा. ऑगस्टची डेडलाईनही पुढे गेली

मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून येत्या ऑगस्ट महिन्यापासून या मार्गावरून मेट्रोची वाहतूक सुरू होणार होती. मात्र, ही डेडलाइन देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

16:18 (IST) 18 Jul 2025

जे. जे. रुग्णालयातील महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

जे. जे. रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री वसतिगृहातील त्यांच्या खोलीमध्ये औषधांचे अतिरिक्त सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...सविस्तर बातमी
16:06 (IST) 18 Jul 2025

गरीबीमुळे ऑनलाईन मूत्रपिंड विकण्याचा प्रयत्न…सायबर भामट्यांकडून ३ लाखांची फसवणूक

४५ वर्षीय तक्रारदार अंधेरी येथील एका खासगी कंपनीत शिपाई म्हणून काम करतात. ...वाचा सविस्तर
16:05 (IST) 18 Jul 2025

कडोंमपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शस्त्रक्रियेचे टाके काढण्याचे यंत्रच नाही...

आयुक्तांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी रुग्ण नातेवाईकांकडून केली जात आहे. शास्त्रीनगर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश चौधरी यांनी याप्रकरणाची माहिती घेतो असे सांगितले. ...वाचा सविस्तर