Mumbai Maharashtra Breaking News Updates : शिवसेनेचे (ठाकरे) नेते आज महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटणार आहेत. उद्धव ठाकरेंचे शिलेदार राज्यातील कायदा व सुव्यवस्था, अनेक मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये व आक्षेपार्ह कृत्यांबाबत राज्यपालांना निवेदन देणार. तर, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज भेट होणार असून कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्ये, विधान भवनात रमी खेळण्याचा प्रकार याबाबत अजित पवार आज निर्णय जाहीर करणार आहेत. यासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच लोकसभेत आज पहलगामधील दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारतीय लष्कराने हाती घेतलेली ऑपरेशन सिंदूर या मोहिमेविषयी चर्चा होणार आहे. त्यावरही आपलं लक्ष असेल.
मुंबईतील कांदीवली येथील एका डान्स बारवरील कारवाईनंतर हा डान्स बार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या मालकीचा असल्याचं समोर आलं आहे. यावरून कदम यांच्यावर टीका होत आहे. अशातच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही योगेश कदम यांच्या पाठिशी आहोत. यावर शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “प्रत्येक अनैतिक कामांमध्ये एकनाथ शिंदे पुढे आहेत.” यासह इतर राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असेल.
लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली जाणार आहे. सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बोलणार आहेत. तर, काँग्रेसने या चर्चेला उपस्थित राहण्याबाबत सर्व खासदारांना व्हीप जारी केला आहे. या चर्चेवरही आपलं लक्ष असेल.
Mumbai Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय व सामाजिक बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
रेव्ह पार्टी प्रकरणाच्या वैद्यकीय अहवालावर खडसेंना संशय; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोणी गडबड केली तर…”
पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीत रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी रविवारी छापा टाकत मोठी कारवाई केली. या प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनाही अटक करण्यात आली. प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली. तसेच या कारवाई दरम्यान कोकेन, गांजासह आदी अमली पदार्थही जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जातं.
मित्र पक्षानेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते फोडले ; रत्नागिरीत भाजपा कडून शिवसेनेला मोठा धक्का…
रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणा-या निवडणुकांआधीत सत्ताधारी मित्र पक्ष शिवसेना व भाजपामध्ये चुरस सुरु झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे हे रत्नागिरी जिल्हा दौ-यावर असताना हा पक्ष प्रवेश झाल्याने दोन्ही मित्र पक्षातील कुरघोडी पुन्हा पहावयास मिळत आहे.
प्राजंल खेवलकरांच्या मद्य सेवन चाचणीवर एकनाथ खडसेंचा संशय; पुण्यतील पोर्शे अपघात प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाले...
एकनाथ खडसे म्हणाले, "डॉ. खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचे काही वृत्तवाहिनींच्या माध्यमातून कळले. इथे एक साधा प्रश्न पडत आहे की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तात्पर्यतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागत आहे? मागच्या वर्षी पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण झाले होते. त्यात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभला आहे याची सहज आठवण झाली. त्यामुळे डॉ. खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाची चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना ? अशी शंका उपस्थित होत आहे."
भ्रष्ट मंत्र्यांविरोधातील पुरावे राज्यपालांना दिले : सुषमा अंधारे
सुषमा अंधारे म्हणाल्या, “राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार असेल, तिथे तीन वेळा पोलिसांची धाड पडलेली असेल तर असा माणूस मंत्रिपदावर कसा काय राहू शकतो? माणिकराव कोकाटेंसारख्या नेत्याने जी असंवेदनशील वक्तव्ये केली आहेत त्यानंतरही त्यांना अभय दिलं जातंय, अत्यंत बेशिस्त, बेताल आणि उर्मटपणे बोलणाऱ्यांना संजय शिरसाटांना पायउतार व्हायला लावणं गरजेचं आहे. योगेश कदम, संजय शिरसाट यांच्यासह इतर लोकांशी संबंधित अनेक कागदपत्र, पुरावे, पेन ड्राईव्हमधील मोठी फाईल अनिल परब यांनी राज्यपालांना दिली आहे."
योगेश कदम, महजन, शिरसाटांसह सहा मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, ठाकरे गटाची राज्यपालांना विनंती
शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पक्षातील काही नेत्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या, आक्षेपार्ह कृत्ये करणाऱ्यांना मंत्र्यांची मंत्रिमंडळातूल हकालपट्टी करण्याची मागणई केली. यासंबंधीचं निवेदन त्यांनी राज्यपालांना दिलं. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, राज्यपालांनी योगेश कदम, गिरीश महाजन, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, संदीपान भुमरे, नितेश राणे यांचा राजीनामा घ्यायला हवा.
शेतकऱ्यांना वर्षातील ३६५ दिवस दिवसा वीज मिळणार; मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस
डिसेंबर २०२६ नंतर शेतकऱ्यांना रात्रीच्या विजेसाठी शेतात जावे लागणार नाही. शेतकऱ्यांना वर्षातील ३६५ दिवस दिवसा वीज देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते विदर्भ भाजपाच्या बैठकीत कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
भाजपचे पाशा पटेल यांच्यावर कांदा उत्पादकांचा रोष का ?
आता मढ ते वर्सोवा प्रवास केवळ पाच मिनिटांत! २४०० कोटी रुपयांच्या केबल ब्रिजला केंद्राची मंजुरी
"भारताचं इंडिया असं भाषांतर करू नये", सरसंघचालक मोहन भागवताचं वक्तव्य
मोहन भागवत म्हणाले, "भारत हे विशेषनाम आहे, त्यामुळे त्याचं भाषांतर करू नये. इंडिया दॅट इज भारत असं अनेक ठिकाणी उल्लेख आहे. मात्र, भारत हा भारत आहे. म्हणूनच आपल्या चर्चेत, लिहिताना, बोलताना वैयक्तिक असो अथवा सार्वजनिक ठिकाणी आपण भारताला भारत म्हटलं पाहिजे. कारण भारत हा भारत आहे. भारताची तीच ओळख आहे आणि ती ओळख आपण जपली तरच भारताचा सन्मान होईल."
कोल्हापूर - कळंबा कारागृहातून जन्मठेपेचा आरोपी सुरेश चोथे फरार; शिक्षक विजयकुमार गुरव हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत!
"हा नेता फडणवीसांना अडचणीत आणेल", संजय राऊतांचा रोख कोणाकडे? रेव्ह पार्टी प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाले...
संजय राऊत म्हणाले, "कालच्या रेव्ह पार्टी प्रकरणानंतर, एकनाथ खडसे यांच्या जावयाला झालेल्या अटकेनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसत होता. पडद्यामागे काय घडतंय अथवा घडवलं जातंय हे लवरकरच सर्वांच्या लक्षात येईल. महाजन काल इतके आनंदी झाले होते की आपण मंत्री आहोत याचं देखील भान त्यांना राहिलं नव्हतं. हा फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मोकाट सुटलेला *** आहे. हा एक दिवस फडणवीसांना अडचणीत आणेल. भाजपाने गुंड, दरोडेखोर व बलात्काऱ्यांना आपल्या पक्षात घेतलं आहे. भाजपा नेते रवींद्र चव्हाण याची महाजनांना यात साथ आहे.