Maharashtra Political News, 09 November 2023: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील पक्षफुटीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेनेबाबत तर ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय घ्यायचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी असून त्याअनुषंगाने राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सरकारमधील मंत्र्यांमध्येच विसंवाद असल्याचं पाहायला मिळत आहे.
Mumbai Maharashtra News Updates: महाराष्ट्राच्या सर्व राजकीय घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर
नाशिक: दीपावलीच्या पार्श्वभूमिवर, खाद्य पदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील मालदे शिवारात मसाले उत्पादक कंपनीवर छापा टाकण्यात आला.
नागपूर: वाठोडा पोलीस गस्त घालत असताना एक युवक पोलिसांना दिसला. पोलीस दिसताच त्या युवकाने गतीने चालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले असता तो पळायला लागला.
निवडणूक आयोगासमोर आजपासून नियमित सुनावणी चालू होणं अपेक्षित होतं. पण काही किरकोळ शपथपत्रांमधल्या तांत्रिक बाबी समोर करून शरद पवार गटाकडून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता २० नोव्हेंबरपासून सलग सुनावणी होईल, असं सूचित करण्यात आलं आहे - सुनील तटकरे, अजित पवार गटाचे खासदार
कोल्हापूर : ऊस दरासाठी ५०० किलोमीटर अंतराची आक्रोश पदयात्रेची सांगता ऊस परिषदेमध्ये केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे चालू गळीत हंगामाच्या दराची मागणी करून आंदोलनाला विसावा देतील असे वाटत होते. पण त्यांनी जयसिंगपूरच्या मुख्य मार्गावर ऐन दिवाळीत १६ नोव्हेंबरपर्यंत ठिय्या आंदोलन आरंभले आहे. ऊस संघर्षाला धार वाढवण्यासाठी हे आंदोलन होत असले तरी त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीची पेरणी होत असल्याचे काही लपलेले नाही.
छत्रपती संभाजीनगर: तुलनेने कमी दुष्काळाच्या झळा जाणवणाऱ्या गोदाकाठच्या गावातून मराठा आरक्षण मागणीला मिळालेले पाठबळ आणि त्यानिमित्ताने झालेले मराठा जातीचे एकत्रिकरण राजकीय पटलावर नक्की कोणाच्या बाजूला वळेल, यावरून आता तर्कवितर्क लढविले जात आहेत.
अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलेल्या शपथपत्रांपैकी २ हजारांहून जास्त शपथपत्रं खोटी असून त्यातील अनेकांचा मृत्यूही झाला आहे, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून शरद पवार गटाची बाजू मांडताना निवडणूक आयोगासमोर करण्यात आला आहे.
मुंबई: ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारूती चितमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्र डॉ सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, तसेच जनजागृती व्हावी हा यामागील उद्देश आहे.
नागपूर : राज्य सरकारकडून सर्व जिल्ह्यांत मराठा समाजाच्या दस्तावेजात कुणबी नोंदीचा शोध घेतला जात आहे. या तपासणीत आतापर्यंत सापडलेल्या नोंदीपैकी आधी किती लोकांनी कुणबी जात प्रमाणपत्र घेतले आणि किती लोकांच्या कागदपत्रांवर नोंदी आढळल्या नाही याची आकडेवारी सरकारने जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
जयेश हा लष्कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन, पीएफआयसह अनेक दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे.
आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद
नगरसेवक नसल्याने लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात काँग्रेसने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महापालिकेवर धडक दिली.
नागपूर: खाकी वर्दी घालून गुंडगिरी करणे एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच भोवले. दारुच्या नशेत कार चालवून एक दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर पोलिसात तक्रार केल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका ठाणेदारासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अकोला : जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला धक्का बसला आहे. माजी जिल्हाप्रमुखांसह पदाधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुंबई येथील वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
राज्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहीम स्वरूपात काम करावे. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरिता एक हजार टँकर्स लावावेत त्यासाठी विशेथ पथक नियुक्त करावे. एमएमआरडीइची बांधकाम स्थळे धूळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अँटी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1722566137022669273
पुणे : ऐन दिवाळीच्या मुर्हुतावरच वानवडी परिसरात एका सराफी व्यावसायिकावर गोळ्या झाडून सोने लुटून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सराफावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून, त्यातील एक गोळी तोंडाला लागली असून दोन गोळ्या पायाला लागल्या आहेत. त्यात सराफ व्यावसायिक गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अमरावती : प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे-अमरावती-पुणे या विशेष रेल्वेगाडीच्या १० नोव्हेंबर २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत एकूण १८६ फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “महाराष्ट्राच्या बाबतीतले दिल्लीतील राजकीय सट्टेबाजारातील लोकांचे अंदाज ऐकून मला धक्का बसला!”
अमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ आणि भाजीपाला बाजारात होणाऱ्या लिलावात चांगल्या प्रतीच्या काद्याला ४ हजार ५०० रुपये क्विंटलचे दर मिळत आहेत. तर किरकोळ बाजारात हाच कांदा ७० ते ७५ रुपये किलोने विक्री होतो.
नागपूर: वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे. नागपुरात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी (९ नोव्हेंबर) नागपुरात प्रति दहा ग्रॅम २४ कॅरेट सोने ६० हजार ५०० रुपये नोंदवले गेले. हे दर ८ नोव्हेंबरला ६१ हजार रुपये होते.
उलवे भागात जागोजागी लागलेल्या कर वसुलीच्या फलकांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
मराठे आधीपासून ओबीसीच होते. ओबीसींना लागू असलेलं राजकीय आरक्षण आम्हालाही लागू करावं. सरकारनं लवकरात लवकर भूमिका घ्यावी. - मनोज जरांगे पाटील
ते खूप काही काही बोलत असतात. त्यांच्या सगळ्याच गोष्टींवर बोलायला मी मोकळा नाही - छगन भुजबळ
आम्ही मागणी करतोच आहोत. ५० टक्के तुम्ही दिले आहेत. मोदींनी १० टक्के आर्थिक मागासवर्गासाठी दिले आहेत. आणखी १०-१२ टक्के वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची मागणी आहेच. तिथे जनगणना केल्यानंतर ही बाबत त्यांच्यासमोर आली. आमचं तर म्हणणं आहे की जनगणनाही कराच. त्यानंतर आरक्षणाची टक्केवारी वाढवा आणि हा वाद संपवून टाका - छगन भुजबळ
दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात आज सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसला. त्यांचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीला 31 ते 33 जागा मिळतील आणि महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) यांना 15 ते 17 जागा मिळतील. येणा-या काळात या 5 राज्यातील निवडणूकींचा परीणाम हा संपूर्ण देशभरात दिसू लागेल आणि ह्या 5 राज्यांचा त्यांचा अंदाज असा आहे की, 5 पैकी कमीत-कमी 4 राज्ये काँग्रेस जिंकेल. राहुल गांधींची जोरदार हवा आहे - वन लायनर
इनोव्हा कंपनीच्या व्यवस्थापकांची तातडीची बैठक बोलावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागीतल्यानंतर या फलकात बिघाड झाल्याचे सांगण्यात आले.
पुणे : शाळकरी मैत्रिणीला भेटण्यासाठी बुरखा परिधान करणे तरुणाच्या अंगलट आले. विश्रांतवाडी पोलिसांनी एका तरुणाला पकडले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : मेडिकलच्या बालरोग विभागाने फुफ्फुसाच्या प्रतिकारशक्ती संबंधित सिस्टीक फायब्रोसिस या आजाराचे निदान करण्यासाठी एम्स दिल्लीला मदत मागितली. त्यावर एम्सने मदतीचे आश्वासन देत एका डॉक्टरला प्रशिक्षण देत एक यंत्र उपलब्ध करण्याची तयारीही दर्शवली. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास मुलांच्या घामातून या दुर्मिळ आजाराचे निदान मेडिकलला होणे शक्य होणार आहे.
नागपूर : सोशल मीडियाची वाढती व्याप्ती लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयही स्वत: अपडेट करत आहे. या शृंखलेत उच्च न्यायालयाने टेलिग्रामवर स्वत:चा चॅनल सुरू केला आहे. ८ नोव्हेंबरला याबाबत न्यायालयीन प्रशासनाने परिपत्रक काढले.
गोंदिया : सडक/अर्जुनी तालुक्यातील आश्रम शाळेमध्ये एका विध्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकावर अखेर गुन्हा दाखल करीत तपासानंतर त्यांना अटक करून त्यांची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अमरावती : अर्धवेळ नोकरीच्या नावावर एका तरुणाची १३ लाख ७ हजार ९९९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
राहुल शहादेव माने हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बलात्कार आणि खून असे गुन्हे दाखल आहेत.
महाराष्ट्र न्यूज (फोटो -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Mumbai Maharashtra News Updates: मुंबईसह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या