Mumbai Maharashtra News Updates Today, 11 October 2023 : आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात चिंतेचं वातावरण असताना आता हमास आणि इस्रायलमधील युद्धाने आणखी काळजी वाढली आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हवाई हल्ले सुरू आहेत. त्यातच जगातील इतर देशाही या युद्धात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक युद्धाचा भडका उडण्याची भीतीह व्यक्त होत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयातील लहान मुलांच्या मृत्यूप्रकरणी भाजपाच्या चित्रा वाघ यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. गरोदर माता सरकारने दिलेली औषधे आणि पोषण आहार घेत नाहीत. सरकार त्यांना औषधे देऊ शकते, मात्र मिळायला लावू शकत नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. याशिवाय पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर आता मंत्रीमंडळ विस्तारही होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एकूणच महाराष्ट्रासह देश-विदेशातील राजकारणासह दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर…

Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics News
Maharashtra News : “यंदाची निवडणूक शेवटची ठरू नये”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “ज्यांच्या हाती…”
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
praniti shinde question photos of pm narendra modi
खतांच्या बॅगांवर मोदींचा फोटो, आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना खत विकत घेणे मुश्किल; प्रणिती शिंदे संतापल्या
Live Updates

Maharashtra Desh Videsh Updates News in Marathi : राज्यातील राजकारणासह दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

17:32 (IST) 11 Oct 2023
कधीतरी सरकार बदलतं, आपले लोक आले की कार्यकर्त्यांवरील गुन्हे काढून टाकतात - शरद पवार

अशी घटना घडली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या भागातील भगिनी रस्त्यावर उतरल्याच पाहिजे. त्यासाठी त्यांनी आग्रह धरला पाहिजे. काही होत नाही. रस्त्यावर उतरलं म्हणून एखादा गुन्हा दाखल करतील, एखादं कलम लावतील. विद्या चव्हाण यांचं रेकॉर्ड तपासलं तर त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले लक्षात येईल. हे सर्व गुन्हे लोकांच्या प्रश्नासाठी दाखल होतात. त्यामुळे त्याची काही चिंता करायची नसते. कधीतरी सरकार बदलतं, आपले लोक येतात आणि त्यावेळी आम्ही हे गुन्हे काढून टाकतो. त्यामुळे या गुन्ह्यांची काही चिंता करू नका. रास्त प्रश्नांवर रस्त्यावर येणं हा आपला हक्का आहे, ही भूमिका समजून घेतली पाहिजे.

- शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

17:04 (IST) 11 Oct 2023
नवी मुंबईत दुचाकीस्वारांचा विनाहेल्मेट प्रवास सुसाट, तीन हजार दुचाकीस्वारांवर कारवाई

नवी मुंबई : हेल्मेट न वापरल्याने अपघातांत मरण पावणाऱ्यांची दुचाकीस्वारांचे प्रमाण खूप असल्यामुळे हेल्मेटसक्ती असली तरी अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट सुसाट वाहने चालवत आहेत. नवी मुंबई आरटीओने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत तब्बल २ हजारांहून अधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली असून १ हजार ७६ व्यक्तींचे परवाने निलंबित केले आहेत.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 11 Oct 2023
वाशीममध्ये शिक्षकाला जिवंत जाळलं; सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका, म्हणाल्या…

दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी एका शिक्षकाला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. याबाबत लोकसत्तामध्ये प्रकाशित वृत्त वाचून खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केले व गृहमंत्री फडणवीस यांचे गृह खात्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही केली.

सविस्तर वाचा

16:42 (IST) 11 Oct 2023
महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नका; नाना पटोले म्हणतात, ‘राज्यकर्त्यांच्या पाठबळाशिवाय अंमली पदार्थ…’

सरकारने महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नये. राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय अंमली पदार्थांची तस्करी अशक्य आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

सविस्तर वाचा...

16:25 (IST) 11 Oct 2023
नवी मुंबई महापालिका आता पाणपक्षी गणना करणार, आशियाई पाणपक्षी गणनेसाठी निविदा

नवी मुंबई – नवी मुंबई शहराला विस्तीर्ण असा खाडी किनारा आहे. त्यामुळे खाडीकिनारी, पाणथळ क्षेत्रात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी तसेच स्थानिक पक्षी आढळतात. मात्र या विविध प्रजातींच्या पक्षांची नोंद महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिका शहरातील पाणथळ क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरीत व स्थानिक पक्षांची गणना करणार आहे.

सविस्तर वाचा...

16:23 (IST) 11 Oct 2023
संजय राऊत दुसऱ्या मालकाशी प्रामाणिक, शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांचा टोला

उद्धव ठाकरे यांना संजय राऊत खोटी माहिती देतात. संजय राऊत यांच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पुत्राने पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेसच्या दावणीला बांधला होता, असे नरेश म्हस्के म्हणाले.

सविस्तर वाचा...

16:19 (IST) 11 Oct 2023
महिलांनो रस्त्यावर उतरा, सरकारने केसेस टाकेल, पण आपलं सरकार आल्यावर त्या केसेस हटवू - शरद पवार

आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि आता तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत. ही जमेची परिस्थिती एका बाजूला आहे, दुसरीकडे मणिपूरसारखी घटना समोर येते. त्यामुळं आपल्याला जागरुक राहावं लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठं घडला, तर आपल्या भगिनी रस्त्यावर उतरायला हव्या. काय होईल तर सरकार तुमच्यावर गुन्हे दाखल करेल, विविध कलमे लावतील. तुम्ही चिंता करु नका, सरकार बदलत असते आणि आपण त्या केसेस काढून टाकत असतो.

- शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

16:06 (IST) 11 Oct 2023
ज्या दिवशी आम्ही त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारायला लागू त्यावेळी अवघड होईल - जयंत पाटील

सगळ्यांना विश्वासात घेणं म्हणजेच शरद पवार आहेत. आता त्याच शरद पवारांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, ज्या दिवशी आम्ही त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारायला लागू त्यावेळी अवघड होईल.

- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

15:46 (IST) 11 Oct 2023
माहेरहून पैसे न आणल्याने महिलेचा खून; पतीसह सासऱ्याला जन्मठेप

पती कांताराम, सासरे सत्यवान, सासू बायसाबाई यांनी दीपाली यांच्याकडे घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती.

सविस्तर वाचा...

15:45 (IST) 11 Oct 2023
अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार करणारा गजाआड

अल्पवयीन मुलीला मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केले. दुगडच्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी घाबरली.

सविस्तर वाचा...

15:44 (IST) 11 Oct 2023
नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात वीज अपघात टाळायचे, तर हे वाचाच…

नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी विविध मंडळ समूह मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करतात. याप्रसंगी महाप्रसाद आणि भोज दनासाठी मोठी गर्दीही होते.

सविस्तर वाचा

15:43 (IST) 11 Oct 2023
नवरात्रोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून एकाला कोयता दाखवून धमकावले

नवरात्रोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून मंडळाच्या सचिवांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यांनतर कोयता दाखवून त्यांना धमकावले.

सविस्तर वाचा...

15:38 (IST) 11 Oct 2023
"शरद पवार हुकुमशाह, असा आरोप केला जात आहे, पण..."; जयंत पाटलांचं अजित पवार गटाला प्रत्युत्तर

शरद पवार हुकुमशाह आहेत, असा आरोप केला जात आहे. मात्र, या कार्यक्रमात इतका वेळ ते बसले आहेत, एकदाही ते तू बोलू नकोस, तूच बोल, कुणीच बोलायचं नाही, आता मीच एकटा बोलणार असं काही बोलले नाहीत. शरद पवार हुकुमशाहीने, मनमानी करून पक्ष चालवतात असा आरोप केला जात आहे. मात्र, माझ्यासह इथं बसलेल्या कुणालाही तो अनुभव नाही. एकटा जालना जिल्ह्यातील निर्णय घ्यायचा असेल, तरी शरद पवारांनी राजेश टोपे आणि त्या जिल्ह्याच्या अध्यक्षासह कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय प्रमुख निर्णय कधीच घेतला नाही.

- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

15:36 (IST) 11 Oct 2023
समोरच्या बाजूने असं सांगितलं जाईल की, निवडणुकीला इतके पैसे खर्चायला देतो, पण... - जयंत पाटील

समोरच्या बाजूने असं सांगितलं जाईल की, निवडणुकीला इतके पैसे खर्चायला देतो, तेवढे देतो. ते सगळं होईल, मात्र शिक्का मारायला माणसं कुठून आणणार? मतं देणाऱ्या माणसांच्या मनात शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवार जिथं उभे राहतील, तिथं पक्ष असेल. आज निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई सुरू आहे. त्या सुनावणीत शरद पवारांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं जात आहे. २५ वर्षे शरद पवारांच्याच कार्यशैलीमुळे यांना पदं मिळाली, हे मंत्री झाले, वेगवेगळ्या पदांवर पोहचले. आज २५ वर्षानंतर त्यांच्याच कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करता, मग २५ वर्षे तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याचं काय?

- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

15:29 (IST) 11 Oct 2023
नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात वीज अपघात टाळायचे, तर हे वाचाच…

नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी विविध मंडळ समूह मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करतात. याप्रसंगी महाप्रसाद आणि भोज दनासाठी मोठी गर्दीही होते.

सविस्तर वाचा

15:01 (IST) 11 Oct 2023
...त्यामुळे आता परतीचे दोर कापण्यात आले आहेत - जयंत पाटील

शरद पवार आपला पक्ष वाचवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसतात. यात सगळंच आलं. कार्यकर्त्यांना यावरून काय प्रकार सुरू आहे हे सगळं लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे आता परतीचे दोर कापण्यात आले आहेत. आपल्याला लढायचं आहे. महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा, त्यांची ताकद, जनतेच्या मनातील शरद पवारांबद्दलचं आदराचं स्थान माझं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं भांडवल आहे.

- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

14:58 (IST) 11 Oct 2023
"दोन्ही गट एकत्र आले तर डोक्याला ताप नको, अशी शंका सगळ्या कार्यकर्त्यांना, त्यामुळे..." जयंत पाटलांचं वक्तव्य

बऱ्याच जणांना अशी शंका आहे की, हे दोन्ही गट परत एकत्र आले, तर कशाला डोक्याला त्रास. अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे आम्हीच सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की, आम्ही एक होणार नाही. सगळ्यांना ही शंका असल्याने कशाला घाई, कळ काढा, असं कार्यकर्ते एकमेकांना म्हणतात. एक महिला कार्यकर्ती दुसरीला म्हणते की, तुला काही कळतं का, ते आतून एकच आहेत. मी महिला कार्यकर्त्यांच्या मनातील बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तसं काहीही नाही. आपला पक्ष वाढू नये म्हणून केलेली ही शक्कल आहे. आपला पक्ष वाढू नये म्हणून ही कुजबुज केली जात आहे.

- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

14:08 (IST) 11 Oct 2023
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला, दोन वाहनांचे नुकसान तर एक कामगार जखमी

फेरीवाले मोठ्या संख्येने जमल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. फेरीवाल्यांनी मात्र कोणताही हल्ला केला नसल्याचा दावा केला आहे.

सविस्तर वाचा...

14:04 (IST) 11 Oct 2023
पनवेल : भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या स्वागतासाठी शेकापचे पदाधिकारी

पनवेल : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेल दौऱ्यासाठी बुधवारी येणार असल्याने शहरातील मुख्य चौकातील रस्ता डांबराने तुळतुळीत केल्यामुळे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या स्वागतासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बुधवारी उभे राहिले. यावेळी शेकाप पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये रस्त्यात खड्डे पडले आणि सध्या डांबराने तुळतुळीत केलेले रस्ते अशी छायाचित्रे होती.

सविस्तर वाचा...

13:55 (IST) 11 Oct 2023
“आजारी पत्नीमुळे प्रेमविवाह केला पण…”, भरोसा सेलच्या मध्यस्तीने संसार पुन्हा सुरळीत

पत्नीला ब्रेन ट्यूमर असल्यामुळे पतीने दुसरीशी प्रेमविवाह केला. दोन्ही पत्नी एकमेकींसोबत गुण्यागोविंदाने राहू लागल्या. मित्राच्या सांगण्यावरून आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या दुसऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला. त्यामुळे संसार तुटण्याच्या काठावर आला.

सविस्तर वाचा

13:50 (IST) 11 Oct 2023
पिंपरी महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘गोड’

८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि २० हजार रुपये जादा रक्कम एकत्रित दिली जाणार आहे.

सविस्तर वाचा...

13:50 (IST) 11 Oct 2023
पुणे : विद्यापीठ चौकातील कोंडीतून लवकरच सुटका! उभा राहतोय मेट्रोशी संलग्न दुमजली उड्डाणपूल

महामेट्रोने नळस्टॉप चौकात उभारलेल्या दुमजली उड्डाणपुलाप्रमाणेच या पुलाची रचना असणार आहे. मेट्रोच्या खांबांशी तो संलग्न असेल.

सविस्तर वाचा...

13:48 (IST) 11 Oct 2023
मध्य प्रदेशातून पुण्यात येऊन घरफोडी करणारी टोळी अखेर गजाआड

मध्य प्रदेशातील चोरट्यांची टोळी मध्यरात्री सोसायटीच्या आवारात शिरायची. बंद सदनिकांची पाहणी करुन कटावणीने कुलूप तोडायचे. ऐवज लांबवून पसार व्हायचे.

सविस्तर वाचा...

13:47 (IST) 11 Oct 2023
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

सोनाली विवाहित होती. विवाहानंतर तिचा घटस्फोट झाला. ऊरळी कांचन परिसरात ती माहेरी राहत होती.

सविस्तर वाचा...

13:46 (IST) 11 Oct 2023
जलतरण तलावांची सुरक्षा वाऱ्यावर…जाणून घ्या काय आहे स्थिती?

महापालिकेची नियमावली खासगी तलावांना लागू होत नाही, असे क्रीडा विभागाच्या उपायुक्त डाॅ. चेतना केरूरे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

13:44 (IST) 11 Oct 2023
मुंबई महानगरपालिकेत बोनसचे वारे, २० टक्के बोनसची मागणी

मुंबई : दिवाळी जवळ येऊ लागली असून मुंबई महानगरपालिकेमध्ये सानुग्रह अनुदान अर्थात बोनसचे वारे वाहू लागले आहेत. पालिकेतील सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने बोनसच्या मागणीसाठी मंगळवारी महानगरपालिका मुख्यालयात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली. पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी वार्षिक उत्पन्नाच्या २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

13:44 (IST) 11 Oct 2023
"पुण्यातील महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थ विकण्याचं काम सुरू", रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

पुण्यातील महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थ विकण्याचं काम सुरू आहे. पोलिसांना सर्व गोष्टी माहिती आहेत. माझी पोलिसांना विनंती आहे की, उमलती फुलं जाळू नका. १८-१९ वर्षांची मुलं आहेत. मलाही मुलं आहेत आणि सर्वांनाच मुलं आहेत. अशापद्धतीने घराजवळ मुलांना गांजा आणि अमली पदार्थ सहजपणे मिळत असतील, तर अत्यंत चुकीचं आहे. पोलिसांनी यात लक्ष घातलं पाहिजे.

- रवींद्र धंगेकर (काँग्रेसचे आमदार)

13:38 (IST) 11 Oct 2023
पुणे शहरातील समाविष्ट २३ गावांच्या विकासाची जबाबदारी आता अधिकाऱ्यांवर!

२३ गावांतील विकासासाठी महापालिकेकडून २८ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावांमध्ये सुविधा पुरविणे आणि समस्या सोडविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आहे.

सविस्तर वाचा...

13:37 (IST) 11 Oct 2023
पीएमपीची प्रासंगिक करार बस सुविधा आता माफक दरात

नैसर्गिक इंधनावर (सीएनजी) धावणाऱ्या आणि विजेवर धावणाऱ्या या बस (इलेक्ट्रिकल बस- ई-बस) प्रासंगिक करार सुविधेसाठी देण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा...

13:29 (IST) 11 Oct 2023
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाबद्दल तेव्हाही कागदपत्रांसह बोलले होते, मी आत्ताही... - सुषमा अंधारे

मी तर गोल बिल्डिंगमधील श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाबद्दल तेव्हाही कागदपत्रांसह बोलले होते. मी आत्ताही माझा विवेक जागा ठेवत कुठल्याही शब्दांचा फेरफार न करता, शब्दच्छल न करता, कुठलेही आढेवेढे न घेता मी पुन्हा शांतपणे सांगते आहे की, ससूनचे आधीचे अधिष्टाता काळे, आताचे अधिष्टाता ठाकूर, ललित पाटलावर उपचार करणारे डॉक्टर, कर्मचारी या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे.

- सुषमा अंधारे (शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या)

12:57 (IST) 11 Oct 2023
रेल्वे मार्गावर जिना नसल्याने डोंबिवलीतील आयरे, देवीचापाडा येथील नागरिकांचा रेल्वे मार्गातून प्रवास

अति जलदगतीने या रेल्वे मार्गावरून वेगवान मालगाड्या धावणार आहेत. त्यामुळे हे मार्ग ओलांडताना प्रवाशांना जीव धोक्यात घालावे लागणार आहे.

सविस्तर वाचा...

12:57 (IST) 11 Oct 2023
वनविभागाकडून पहाडी पोपट जप्त

पोलिसांनी त्याच्याकडून नऊ पोपट जप्त केले असून त्याने हे पोपट कोणाला विक्री केले त्याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे.

सविस्तर वाचा...

12:56 (IST) 11 Oct 2023
चिनी टोपल्यांचे भारतीय टोपल्यांवर आक्रमण, भारतीय टोपल्यांच्या मागणीत ३० ते ४० टक्क्यांनी घट

भारतीय टोपलीच्या किंमतीच्या दरात चिनी टोपली स्वस्त असल्यामुळे नागरिकांकडून चिनी टोपल्या खरेदी केल्या जात आहेत.

सविस्तर वाचा...

12:56 (IST) 11 Oct 2023
डोंबिवलीत गरब्यासाठी दत्तनगर चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल

गरब्यासाठी सिनेकलाकार, विविध क्षेत्रातील मंडळी, राजकीय मंडळी येण्याची शक्यता विचारात घेऊन या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

12:55 (IST) 11 Oct 2023
ठाणे : सिलिंडर भडक्यात जखमी महिलेचा मृत्यू

साबेगाव येथे सीताबाई निवास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका सदनिकेत सिलिंडरची गळती होऊन भडका उडाला होता.

सविस्तर वाचा...

12:55 (IST) 11 Oct 2023
ठाणे : विजेचा झटका लागून दोनजण जखमी

विद्युत तारांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. त्यावेळी या वीजेच्या तारेच्या संपर्कात येऊन सुरज आणि आशुतोष यांना विजेचा झटका बसला.

सविस्तर वाचा...

12:54 (IST) 11 Oct 2023
घोडबंदर मार्गावर कंटेनर उलटला; दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी

या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून बोरिवली, वसई आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सविस्तर वाचा...

12:52 (IST) 11 Oct 2023
शेतकरी आत्‍महत्‍यांचे सत्र सुरूच, अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍यांचे सत्र सुरूच असून गेल्‍या दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यंदा ऑगस्‍टमध्‍ये पावसाचा खंड, काही भागात झालेली अतिवृष्‍टी यामुळे पिकांचे उत्‍पादन कमी होण्‍याची शक्‍यता असून त्‍याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.

सविस्तर वाचा

12:35 (IST) 11 Oct 2023
...तेव्हा एकनाथ शिंदेंच्या मार्फत अनिल जयसिंगानी मातोश्रीवर आले होते - सुषमा अंधारे

असाच एक फोटो मागे अनिल जयसिंगानी प्रकरणातही समोर आला होता. त्या मातोश्रीवरील फोटोवरही मी असं म्हटलं होतं की, त्यावेळचे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख कोण होते हे पाहा. ते ठाण्याच्या जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून आले होते, म्हणजेच तेव्हा एकनाथ शिंदेंच्या मार्फत अनिल जयसिंगानी मातोश्रीवर आले होते.

- सुषमा अंधारे (शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या)

12:35 (IST) 11 Oct 2023
नागपूर : गंगाजमुनातील तरुणींचा खापरखेड्यात देहव्यापार

गंगाजमुनातील काही तरुणींना ग्रामीण भागातील हॉटेल, ढाब्यावर नेऊन देहव्यापार करवून घेण्यात येत आहे. खापरखेड्यातील गुप्ता नावाच्या युवकाने आईच्या मदतीने गंगाजमुनातील तरुणींकडून देहव्यापार सुरु केला होता.

सविस्तर वाचा

12:27 (IST) 11 Oct 2023
“आपले जीवन असे का ग?” आईला प्रश्न करून २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास…

आपली परिस्थिती कधी बदलणार, आपले जीवन असे का? वृध्द आईला असे प्रश्न विचारून एका २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. नागेश दुर्गम (२१, रा.टेकडा ताल्ला ) असे त्या शेतकऱ्याचे नाव असून म्हातारपणात वृध्द आईचा आधार हरवला आहे.

सविस्तर वाचा

12:22 (IST) 11 Oct 2023
वसई : मीरा रोडमध्ये काशिगाव या नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती होणार, आयुक्तालयातील हे १८ वे पोलीस ठाणे

वसई – मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात काशिगाव या नव्या पोलीस ठाण्याची घोषणा करण्यात आली आहे. काशिमिरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून हे पोलीस ठाणे तयार करण्यात येणार आहे. आयुक्तालयातील हे १८ वे पोलीस ठाणे असणार आहे.

सविस्तर वाचा..

12:18 (IST) 11 Oct 2023
“किडनी घ्या अन् शाळा दत्तक द्या…”, भीक्षा आंदोलनानंतर उद्विग्न शेतकऱ्याचे शाळा दत्तक योजनेविरोधात अभिनव आंदोलन

शासनाने शाळा दत्तक योजना सुरू केल्यामुळे सर्वस्तरातून नाराजीचा सूर उमटत आहे. आर्णी येथील शेतकरी, कवी विजय ढाले यांनी शासनाच्या या निर्णयाला अभिवन आंदोलनांद्वारे विरोध सुरू केला आहे.

सविस्तर वाचा

12:15 (IST) 11 Oct 2023
धक्कादायक ! दिव्यांगत्वाच्या नावावर शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि तलाठी करीत आहेत शासनाची दिशाभूल, प्रकरण काय? वाचा…

तहसील कार्यालयात कार्यरत काही अधिकारी, कर्मचारी व तलाठी दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र देवून शासकीय योजनांचा लाभ घेत शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचा खळबळजनक आरोप शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी विजय क्षीरसागर यांनी केला आहे.

सविस्तर वाचा

12:15 (IST) 11 Oct 2023
घरकुल अनुदानात शहरी, ग्रामीण भेदभाव? अपुऱ्या अनुदानामुळे घरकुले रखडली

घरकुल आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव का? सर्वत्र साहित्याचे दर सारखे असताना अनुदानात मात्र तफावत का ? असा सवाल ग्रामीण भागातील लाभार्थी वर्गातून होत आहे.

सविस्तर वाचा

11:56 (IST) 11 Oct 2023
सांगली : राजकीय श्रेयवादाचे युद्ध टाळण्यासाठी जतसाठी सिंचन योजनेचे गाजावाजा न करता काम सुरू

सांगली : पाणी द्या, अन्यथा कर्नाटकमध्ये जाऊ असा इषारा देणाऱ्या जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित राहिलेल्या ६५ गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ योजनेचे काम सुरू करण्यात आले. राजकीय श्रेयवादाचे युद्ध टाळण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता योजनेचे काम सुरू झाले.

सविस्तर वाचा...

11:55 (IST) 11 Oct 2023
मुंबई : महागड्या मोटरगाड्या फोडून चोरी करणाऱ्यास अटक, तीन गुन्हे उघड

मुंबई : महागड्या मोटरगाड्या फोडून त्यात ठेवलेल्या वस्तू चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या अटकेमुळे तीन गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक आरोपी मुंबईसह नवी मुंबई, पनवेल परिसरातही चोऱ्या करत होता.

सविस्तर वाचा...

11:54 (IST) 11 Oct 2023
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंबरोबर कसा? व्हायरल फोटोवर सुषमा अंधारे म्हणाल्या...

ललित पाटील कोण माणूस आहे हे मला माहिती नाही, असं मंत्री दादा भुसे सांगतात. मात्र, कालच एक फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो मातोश्रीवरील आहे. त्या फोटोत अर्थात उद्धव ठाकरेही आहेत. परंतू त्या उद्धव ठाकरे मातोश्रीवर असणं अत्यंत स्वाभाविक आहे. मातोश्रीवर पद्ध अशी आहे की, एखादी व्यक्ती ज्या जिल्ह्यातून येते त्या जिल्ह्यातील मोठा नेता किंवा अधिकृत व्यक्ती त्या व्यक्तीला घेऊन येते. याचा अर्थ ललित पाटीलला दादा भुसेच मातोश्रीवर घेऊन आले होते.

- सुषमा अंधारे (ठाकरे गटाच्या नेत्या)

11:49 (IST) 11 Oct 2023
इस्रायलकडून मोठा हल्ला, थेट हमास सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब वर्षाव

इस्रायल आणि हमासमधील युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इस्रायलच्या सैन्याने (इस्रायल डिफेन्स फोर्स -आयडीएफ) बुधवारी (११ ऑक्टोबर) गाझात हमासच्या सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरासह २०० ठिकाणी बॉम्बचा वर्षावर केला. एएनआय वृत्तसंस्थेने द टाईम्स ऑफ इस्रायलच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, इस्रायलावरील हल्ल्यात हमास सैन्य प्रमुख मोहम्मद डेईफची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे इस्रायलने थेट त्याच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब हल्ला केला.

सविस्तर वाचा...

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स