Maharashtra Political News Highlights, 10 November 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणावरून राज्यात दोन दिवसांपासून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात आपल्या मुलाची बाजू मांडताना पाहायला मिळाले. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Updates Today : राजकीयइतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

20:40 (IST) 10 Nov 2025

उद्धव ठाकरे गटाला धक्का : शहर प्रमुख दीपक कापसे काँग्रेसमध्ये परतले

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव सेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक दीपक कापसे यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. ...सविस्तर बातमी
20:34 (IST) 10 Nov 2025

शत्रुबळ जाणण्यासाठी उमेदवारांची ज्योतिषांकडे धाव

छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार अर्ज भरण्यापूर्वी विजयाचा भविष्यवेध जाणून घेण्यासाठी ज्योतिषांकडे जात आहेत. पत्रिका व ग्रहदशा पाहून शत्रुबळ आणि मुहूर्त निश्चित करून उपासना पद्धतींचाही सल्ला घेतला जातो. ...सविस्तर बातमी
20:10 (IST) 10 Nov 2025

अतिवृष्टी बाधितांना आजपर्यंत इतक्या कोटींची मदत; सविस्तर वाचा, शेतकऱ्यांना थेट किती मदत, रब्बीसाठी दिलासा मिळाला ?

अतिवृष्टी आणि महापुराचा खरिपातील सर्वच पिकांना फटका बसला. त्यामुळे राज्य सरकारने खरीप हंगामातील पिके, खरडून गेलेल्या जमिनीसह रब्बी हंगामासाठी आर्थिक मदत, अशी एकूण ३१,६२८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. ...अधिक वाचा
20:00 (IST) 10 Nov 2025

गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यात तोतया पोलिसांचा धुमाकूळ… दिवसाढवळ्या रस्त्यावर २० तोळे दागीन्यांची लूट

शहरातल्या चार ठिकाणी भर दिवसा तोतया पोलीसांनी ज्येष्ठ नागरिक, महिलांना टार्गेट करत अवघ्या काही तासांत दिवसाढवळ्या तब्बल २० तोळे सोन्याचे दागीने आणि ७ लाखांची रोख रक्कम लुटल्याने गस्तीचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंगवर गंभीर प्रश्नचिन्ह लागले आहे. ...अधिक वाचा
19:37 (IST) 10 Nov 2025

बनावट बँक खात्यातून २१ कोटींची उलाढाल, फसवणूक करणा-या टोळीचे २१ राज्यांत जाळे

पुण्यातील जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती महिनाभरात अहवाल सादर करेल, पोलिस तपासही सुरू असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “या प्रकरणातून कोणीही सुटणार नाही; दोषींवर कठोर कारवाई होईल.” ...वाचा सविस्तर
19:29 (IST) 10 Nov 2025

अजित पवार-तावरे यांच्यात पुन्हा लढत

माळेगाव नगरपंचायतीची ३० मार्च २०२१ रोजी स्थापना झाली. तत्पूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती. तालुक्यातील सर्वात मोठी ही ग्रामपंचायत होती. ...सविस्तर बातमी
19:18 (IST) 10 Nov 2025

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर विविध आंबेडकरी संघटनांकडून ठिय्या आंदोलन

पुण्यात आंबेडकरी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारासाठी ठिय्या आंदोलन केले; काहींनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी ताब्यात घेतले. ...सविस्तर वाचा
18:56 (IST) 10 Nov 2025

Video : रिक्षाचालकाचा बेजबाबदारपणा, अल्पवयीन शाळकरी मुलीकडे रिक्षाचे स्टेअरींग, समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल….

खोपोलीत शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. ...वाचा सविस्तर
18:50 (IST) 10 Nov 2025

गडचिरोलीतील ५ प्रगतशील शेतकरी जाणार विदेश दौऱ्यावर, ‘हे’ आहे कारण…

कृषी विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील पाच प्रगतशील शेतकऱ्यांची विदेश अभ्यास दौर्‍यासाठी निवड करण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
18:33 (IST) 10 Nov 2025

शंकरबाबांच्या ‘घरा’त २९ वा नातू, मूकबधिर जोडप्याच्या बाळाला अचलपूरच्या डॉक्टरांनी दिले जीवनदान

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्या कुटुंबात आता २९ वा नातू जन्माला आला आहे, ज्यात १२ मुली आणि १७ मुलांचा समावेश आहे. ...वाचा सविस्तर
18:07 (IST) 10 Nov 2025

शालीमार यार्डचे आधुनिकीकरण; काही रेल्वे गाड्या रद्द, काही….

दक्षिण पूर्व रेल्वेच्या खडगपूर रेल्वे विभागातील शालीमार यार्डचे आधुनिकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम १३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार आहे. ...सविस्तर वाचा
18:04 (IST) 10 Nov 2025

बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी महिलांचा देशी जुगाड! पट्टा आणि लोखंडी खिळे असलेले...

गेल्या काही वर्षांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचा हैदोस आहे. महिनाभरात तिघांचा बळी बिबट्याने घेतला आहे. ...अधिक वाचा
17:38 (IST) 10 Nov 2025

कर्णकर्कश हाॅर्नने घेतला दुचाकीस्वार तरुणाचा बळी; डंपरचालकाने हाॅर्न वाजविल्यानंतर घाबरलेला तरुण पडल्याने दुर्घटना

सचिन वसंत धुमाळ (वय २८, रा. मल्हार नगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. ...वाचा सविस्तर
17:22 (IST) 10 Nov 2025

कृषी विभागात मोठे परिवर्तन; तब्बल ३८ वर्षांनंतर… नेमका बदल काय?

सन १८८१ च्या फेमीन कमिशनने शिफारस केल्यानुसार जुलै १८८३ मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीत कृषी विभागाचे वापरले जात असलेले बोधचिन्ह व घोषवाक्य हे ३८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले आहे. ...सविस्तर वाचा
17:13 (IST) 10 Nov 2025

Pimpri Chinchwad Crime : भाईगिरीसाठी तरुणावर तलवारीने वार, पोलिसांना तक्रार करणार काय?

पिंपरी येथे एका पान टपरीजवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने 'पोलिसांना तक्रार करणार काय, आम्ही इथले भाई आहोत' असे म्हणत दोघांनी एका तरुणावर तलवारीने वार केल्याची घटना पिंपरीत घडली. ...सविस्तर बातमी
17:07 (IST) 10 Nov 2025

चोर तो चोरच, पार्थवर कारवाई झालीच पाहिजे , मंत्री सरनाईक यांच्या संस्थेला आरक्षण बदलून जमीन -वडेट्टीवार

ग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर तीव्र टीका केली. नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. ...सविस्तर बातमी
16:55 (IST) 10 Nov 2025

इंधन भरून टँकर निघाला, काही वेळातच लागली आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला, उडी मारल्याने चालक बचावला

पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी चौकात सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. ...अधिक वाचा
16:46 (IST) 10 Nov 2025

भंडाऱ्यात अनोखा श्रीकृष्ण- तुळशी विवाह सोहळा; वाजत गाजत कृष्ण मिरवणूक, सहभोजन आणि बरच काही…

पारंपरिक पोशाखातील महिलांनी विवाह गीतांवर नाचत सोहळ्याला रंगत आणली. अंतरपाट, अक्षता आणि पुष्पवर्षाव, फटाक्यांचे आतिशबाजी आणि शेवटी व्हराड्यांची पंगत. हा आगळा वेगळा श्रीकृष्ण तुळशी विवाह सोहळा भंडारा शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिभावात पार पडला. ...सविस्तर बातमी
16:37 (IST) 10 Nov 2025

ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत मेंडकी गावालगत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

मेंडकी येथील रहिवासी असलेले भास्कर गजभिये हा शेतकरी रविवारी सायंकाळच्या सुमारास शेतात सिंदी तोडायसाठी गेले होते. ...सविस्तर वाचा
16:29 (IST) 10 Nov 2025

नागपुरातील मिहानमध्ये व्यवसाय सुरू न केल्याने ८ कंपन्यांचे भूखंड रद्द… तरुणांना रोजगार कसा मिळणार? केवळ इतकेच प्रकल्प सुरू…

राज्यातील महत्वाच्या सेझ प्रकल्पापैकी एक म्हणून मिहानची ख्याती आहे. विदर्भातील सर्वात महत्वाच्या प्रकल्प म्हणून मिहानला बघितले जात होते. ...सविस्तर बातमी
16:23 (IST) 10 Nov 2025

"निवडणूक आयोगाने भाजपाच्या हातातलं बाहुलं बनू नये, तर...", रोहित पवारांची टीका

"एकेकाळी निवडणुकीच्या तोंडावर जनतेला खूष करणाऱ्या सरकारी योजनांवर निवडणूक आयोग स्वतःच्या अधिकारात थेट फुली मारत होतं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे, 2004 साली तमिळनाडूमधील AIDMK पक्षाने शेतकऱ्यांसाठी काढलेली ‘मनी ऑर्डर स्कीम’ तसंच 2011 साली DMK ची मोफत कलर टीव्ही देण्याची योजना.. पाठीचा कणा असलेल्या तत्कालीन निवडणूक आयोगाने या योजना रद्द केल्या होत्या. पण आज याच स्वायत्त संस्थेला भाजपानं इतकं दुबळं केलं की, भाजपाने निर्णय घ्यायचा आणि निवडणूक आयोगाने केवळ मम म्हणायचं, हेच आज सुरु आहे. म्हणूनच महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर चालू केलेली ाडकी_बहीण योजना असो किंवा आता बिहारमधील ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ असो.. निवडणुकीच्या काळात मतदारांच्या खात्यात थेट पैसे पाठवणं हा मतं खरेदी करण्याचा क्लिअर निवडणूक फ्रॉड आहे, पण निवडणूक आयोग मात्र मूग गिळून गप्प आहे. निवडणूक आयोगाचं हे मौन लोकशाहीच्या मूळ तत्त्वालाच पोखरणारं आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाने भाजपाच्या हातातलं बाहुलं न बनता या लोकशाहीचा रक्षक म्हणून काम करावं", असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

16:21 (IST) 10 Nov 2025

"निवडणूक आयुक्तांना ‘गड्डी’ मिळाली असेल," बच्चू कडूंचा ‘ईव्हीएम’वरून गंभीर आरोप

"ईव्हीएममधून मतचोरी होते; निवडणूक आयुक्तांना ‘गड्डी’ मिळाली असेल," असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला. शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले नाही, तर एक जुलैपासून राज्यातील रेल्वे रोखू, असा इशाराही त्यांनी दिला. ...सविस्तर वाचा
16:12 (IST) 10 Nov 2025

बारावीतली विद्यार्थिनी पडली रिक्षाचालकाच्या प्रेमात, मग असे झाले की…

शांतीनगर पोलीस हद्दीत हद्दीत ही मुलगी आईवडिलांसह एका वस्तीत राहते. रिक्षाचालक नकुल तिच्या घरी भाड्याने खोली करून रहात आहे. लग्न झालेले असल्याने तो पत्नीसह येथे राहत होता. ...सविस्तर वाचा
16:12 (IST) 10 Nov 2025

“बच्चू कडूंची गाडी फोडणाऱ्याला तीन लाखांचे बक्षीस”, विखे पाटलांच्‍या समर्थकांचे प्रत्‍युत्‍तर…

शेतकरी कर्जमाफीविषयी जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी त्यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ...सविस्तर बातमी
16:03 (IST) 10 Nov 2025

जिल्ह्यात '' अंगणवाडी सक्षमीकरण टीम ''

ठाणे जिल्ह्यातील बालक आणि मातांच्या पोषण स्थिती सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून योग्य आहार मिळावा यासाठी अंगवणवाडी सक्षमीकरण टीम स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...वाचा सविस्तर
15:54 (IST) 10 Nov 2025

अखेर आरएसएसने मान्य केले, ‘‘कोणत्या जाती, धर्मात जन्म घेतला यावर काहीही अवलंबून नाही’’, भैय्याजी जोशींनी…

तुम्ही जन्म कुठे घेतला, कोणत्या जातीत, धर्मात घेतला यावर काहीही अवलंबून नसते. मात्र प्रत्येकाने योग्य मार्गाने चालावे असे ईश्वराचे वरदान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. ...सविस्तर वाचा
15:45 (IST) 10 Nov 2025

तीन आजी-माजी आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला! बुलढाणा पालिकेतील चित्र

येत्या २ डिसेंबर रोजी पालिका निवडणूक साठी मतदान होणार आहे. ३ तारखेला मतमोजणी होऊन बुलढाण्याचा नगराध्यक्ष आणि ३० सदस्य, बहुमत कोणाला याचा फैसला होणार आहे. ...वाचा सविस्तर
15:33 (IST) 10 Nov 2025

आपल्याच सरकारच्या निर्णयाचा अभाविपकडून विरोध; प्राध्यापक भरतीवरून सरकार विरुद्ध अभाविप समोरासमोर, काय आहे प्रकरण…

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्राध्यापक भरतीच्या शासन निर्णयामध्ये काही निकषांमध्ये बदल करत शैक्षणिक, अध्यापन, संशोधनासाठी ७५ गुण, तर मुलाखतीसाठी २५ गुण निश्चित केले. ...सविस्तर बातमी
15:22 (IST) 10 Nov 2025

आमदार अमोल मिटकरी यांना मोठा फटका; वादग्रस्त वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीने थेट…

राष्ट्रवादीने नव्या प्रवक्तांची यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली. या यादीत अमोल मिटकरी व रुपाली ठोंबरे पाटील यांना स्थान देण्यात आले नाही. ...सविस्तर बातमी
14:01 (IST) 10 Nov 2025

Rohit Pawar : "हिंमत असेल तर समोर या, ओपन डिबेट करू"; रोहित पवारांचं सरकारमधील बड्या नेत्याला खुलं आव्हान

आमदार रोहित पवार हे सातत्याने राज्य सरकारवर टीका करत आहेत. रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला आव्हान दिलं आहे. ...सविस्तर बातमी

Maharashtra News Today Live in Marathi

'एकत्र लढलो नाही तर जनता जागा दाखवेल', भरत गोगावले यांचा मित्र पक्षांना इशारा, (फोटो-संग्रहित छायाचित्र)