Maharashtra Politics Updates : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर २०२५) ७५ वा वाढदिवस असून या निमित्ताने देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्यातील नेत्यांकडून देखील पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच राज्यातील राजकारणात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. काल मुंबईत भाजपाच्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. पुढील दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह अपडेट्सच्या माध्यमातून घेणार आहोत.
Mumbai Pune Marathi News Live Today : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर.....
दोन जातींच्या उपसमित्यांची गरज होती का? ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राज्य सरकारला सवाल
भीमा कोरेगाव प्रकरणातील बेकायदेशीर पुराव्यांच्या आधारावर गडचिरोली प्रकरणात खोटा आरोप; सर्वोच्च न्यायालयात…
कर्ज परतफेड केल्यानंतरच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना लाभ; पणन मंत्री जयकुमार रावल यांचा आदेश
राज्यात युरिया खताचा तुटवडा; कृषिमंत्री भरणे यांनी उचलले महत्त्वाचे पाऊल
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्या; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
इंदापूरमध्ये अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे नुकसान; गाळपावर परिणाम होण्याची शक्यता
पिंपरी- चिंचवड: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या रावण टोळीला बेड्या; गुंडा विरोधी पथकाची कारवाई
MPSC PSI Result: ‘एमपीएससी’च्या पीएसआय मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, शारीरिक चाचणीसाठी हा आहे कट ऑफ
साताऱ्यात शाही सीमोल्लंघनाचे आयोजन
"मनोज जरांगे यांना जे पाहिजे होते, ते…", गिरीश महाजन यांचा दावा
मीनाताई ठाकरे पुतळा विटंबन : बुलढाण्यात दुग्धाभिषेक, जळगावात निदर्शने
VIDEO : हजारोंच्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर, आरक्षणाच्या मुद्द्यावर…
नारायणगाव येथील मीना नदीपात्रात मृतदेह
अतिवृष्टीमुळे काश्मिरमधील देशी सफरचंदांची आवक ठप्प; दरात किलोमागे ५० ते १०० रुपयांची वाढ
संगमेश्वर साडवली येथे जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्याला पकडले
महावितरणची १०५७ प्रकरणे लोकअदालतीमध्ये निकाली
प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडेल म्हणून तयार करू – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
पनवेल आरटीओ मुख्यालयाची जागा अडीच एकरच्या खड्यात
Bachchu Kadu on Farmers: "राज्यातील शेतकरी शिल्लक राहील की नाही…", बच्चू कडू यांची टीका
नाशिक : सेवा पंधरवडा उद्घाटनात विविध लाभांचे वितरण
शिरुरमध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
‘शाळेनंतरच्या शाळे’त विद्यार्थी शिकणार कोडिंग आणि आर्थिक साक्षरता; काय आहे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनोखा उपक्रम?
नाशिक: "ही तर विकृती", गिरीश महाजन संतप्त
पुणे : शाळकरी मुलाला धमकावून अत्याचार
बनावट आयडीवरुन जेवणाची ऑर्डर; जाब विचारल्याने 'डिलिव्हरी बॉय'वर हल्ला
बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या...
बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक समाज जर म्हणत असेल की हैदराबाद गॅझेट लागू करा. त्याच्यात ते एसटीत आहे तर त्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीबद्दल मी सकारात्मक भूमिका दाखवली. पण मी कोण देणारी? मी काही सुप्रीम कोर्ट किंवा केंद्र सरकार नाही. मी संविधान नाही. सवंधानाच्या चौकटीत समाजांना न्याय मिळाल पाहिजे. मग तो गरीब मराठा पासून बंजारा समाजापर्यंत मिळाला पाहिजे, असे पंकाजा मुंडे म्हणाल्या.