Maratha Reservation Morcha Today: रामाच्या भक्तीचं नाटक करायचं आणि विरोधकांचा आवाज दडपायचा हे भाजपा करते आहे. आम्ही रोहित पवारांच्या पाठिशी आहोत. तसंच राजन साळवी, रवींद्र वायकर यांच्या मागेही आम्ही महाविकास आघाडी म्हणून उभे आहोत असं आज संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच नाशिकमध्ये मंगळवारी झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली. तसंच एकनाथ शिंदे यांनीही त्यांना जोरदार उत्तर दिलं. आजही प्रतिक्रिया येत आहेत. रोहित पवारांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. रोहित पवारही कार्यालयात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. या मुद्द्यावरुनही संजय राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे, अजित पवार सगळे ईडीग्रस्त झाले असल्यानेच भाजपासह गेले असं संजय राऊत म्हणाले आहेत. या सगळ्या घडामोडींवर आपली लक्ष असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Maharashtra News Live: "एकनाथ शिंदे, अजित पवार ईडीग्रस्त असल्यानेच भाजपासह गेले", संजय राऊत यांची टीका
नागपूर : ममत्त्वाची सुखद अनुभूती फक्त माणसेच अनुभवतात असे नाही, किंबहुना अधिक जास्त ती प्राण्यांमध्ये दिसून येते. वाघांबाबत बोलायचे तर दोन वर्षांपर्यंत हे बछडे वाघिणीसोबतच राहतात. या कालावधीत ती त्यांना खाऊ घालण्यापासून तर शिकार करण्याचे प्रशिक्षण देते. यादरम्यान मातृत्त्वाचा सोहोळा त्यांच्यातही रंगलेला दिसून येतो. असाच एक अविस्मरणीय प्रसंग उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अनुभवला. ‘एफ २’ ही वाघीण तिच्या तीन महिन्यांच्या दोन बछड्यांसह त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची भ्रमंती करताना दिसून आली.
अमरावती : शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीवर भरपूर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ८४ लाख ७९ हजार ४३६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
करोनामुळे आरोग्याच्या विस्ताराच्या गरजा अधोरेखित केल्या असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच मांडली होती. सविस्तर वाचा
नागपूर : पोलीस आयुक्तांच्या बदलीला काही दिवसांचाच अवधी असताना शहरात अवैध धंदेवाल्यांचा जोर वाढला आहे. वरली-मटका आणि पत्त्याचा जुगाराचे अनेक ठिकाणी अड्डे सुरु झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अकोला : राज्यातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व ‘बोट’ रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत असून त्यात आणखी ८१९ रुग्णवाहिकांची वाढ केली जाणार आहे. १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहेत.
वाशिम : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये रस्ते, वीज, पाणी व इतर मुलभूत सोयीसुविधा निर्माण करुन मागास समाजाच्या उत्थानाकरीता मागील पाच वर्षांत अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत अंदाजे ७६ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले असले तरी सुधारणांची समस्या कायम आहे.
अकोला : अनैतिक संबंधात वाद झाल्याने प्रियकराने विवाहित प्रेयसीची चाकूने सपासप वार करून हत्या केली व नंतर स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील माना येथे मंगळवारी सायंकाळी घडली. अनिल श्रीकृष्ण तायडे (४५ रा. लोहारी, ता. अकोट) असे आरोपीचे नाव असून त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपूर : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. डॉ. विजय फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते.
अकोला : सूर्यमालेत सूर्याला सर्वात जवळ असलेला बुध ग्रह आणि पृथ्वी नंतरचा मंगळ ग्रह २७ जानेवारी रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर युतीच्या रुपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. या अनोख्या दृष्याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.
‘एक कुटुंब एक तिकीट’ असा नारा देत राजकीय पक्षांच्या घराणेशाहीवर सडकून टीका करणाऱ्या भाजपला स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेच्या उभारणीत मात्र राजकीय घराण्यांच्या वारसांवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे पुढे येऊ लागले आहे.
कल्याण – कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरील केळवली रेल्वे स्थानकात एका इसमाने आपली दुचाकी फलाटावर आणून प्रवास केल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. रेल्वे फलाटावर कोणत्याही प्रकारचे वाहन आणण्यास मज्जाव असताना संबंधित इसमाने वाहन केळवली रेल्वे स्थानकात आणले कसे, असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात होते. सविस्तर वाचा…
घारापुरी बेटावरील ८३ स्थानिक ग्रामस्थांचे व्यवसाय संकटात आले आहेत. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत हे व्यवसाय हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना रोजीरोटीला मुकावे लागणार आहे.
डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीत राहुलनगर मध्ये १० फुटाच्या अरूंद रस्त्याला अडथळा होईल अशा पध्दतीने विकासकांनी भागादारी पध्दतीने दोन सुदाम रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड इमारती बांधल्या आहेत. या दोन्ही इमारतीच्या विकासकांनी पालिकेच्या नगररचना विभागाच्या परवानग्या घेतलेल्या नाहीत. सविस्तर वाचा…
‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा (कृत्रिम प्रज्ञा) गैरवापरही होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. याचे उदाहरण म्हणजे डीप फेक तंत्रज्ञान समजण्यात येते़ सध्या या तंत्रज्ञानाने अनेकांची डोकेदुखी वाढवली आहे. सविस्तर वाचा
मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा मुंबईत धडकणार असून २५ तारखेला लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मोर्चेकऱ्याचा मुक्काम नवी मुंबईत होणार आहे.
जे.जे., ससून, घाटी रुग्णालयांसह औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णालयांतील अधिष्ठात्यांशी सातत्याने संपर्कात असून, लवकरच या रुग्णालयांमध्ये मृत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
नागपूरच्या संविधान चौकात आज अंगणवाडी सेविकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. अंगणवाडीची शाळा भरवून आंदोलन करण्यात आले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे मागील अनेक दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे. काल अंगणवाडी सेविकांनी नागपूरच्या व्हरायटी चौकात घेराव केल्याने बराच काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अंगणवाडी सेविकांनी आज पुन्हा संविधान चौकात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडीची शाळा भरवत अनोखं आंदोलन केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी या उपस्थित होत्या. आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूचं राहील आणि या पेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.
बिरेन आणि त्याच्या पत्नीवर १६ वर्षांच्या बांगलादेशी मुलीची तस्करी आणि भाड्याच्या जागेतून कुंटणखाना चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
आज जी वेळ राजकारण्यांवर आली आहे ती उद्या पत्रकारांवर येऊ शकते. सूरज चव्हाणांना अटक केली ही एकतर्फी कारवाई आहे. ईडी या कंपनीच्या मालकांवर कारवाई करणार आहे की नाही? रोहित पवार, रवींद्र वायकर, रोहित पवार, किशोरी पेडणेकर या सगळ्यांना हैराण केलं जातं आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भाजपाचं इतर राज्यांतही हेच चाललं आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये झालेल्या १०८ व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’वर तब्बल २४ कोटी २७ लाख ३९ हजार रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. या उपक्रमासाठी राज्य सरकारकडून ५ कोटी तर केंद्र सरकारकडून ६ कोटी १६ लाख ५५ हजार रुपये प्राप्त झाले होते. ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे संपूर्ण कंत्राट हे भारतीय जनता पक्षाच्या नजिकच्या व्यक्तीच्या कंपनीला देण्यात आले होते.
नागपूर : पोलीस आयुक्तांच्या बदलीला काही दिवसांचाच अवधी असताना शहरात अवैध धंदेवाल्यांचा जोर वाढला आहे. वरली-मटका आणि पत्त्याचा जुगाराचे अनेक ठिकाणी अड्डे सुरु झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून या कामाचा अतिरिक्त बोजा शिक्षकांवर पडला आहे. सर्वेक्षणाची जबाबदारी पालिकेच्या ठोक मानधनावरील शिक्षकांवर सोपवण्यात आली असून दुसरीकडे कायम शिक्षकांना या कामापासून दूर ठेवण्यात आल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
गेल्यावर्षी पालिकेच्या पूल विभागाने फेब्रवारी महिन्यात या प्रकल्पासाठी निविदा मागवली होती. त्यावेळी या प्रकल्पासाठी ६६२ कोटी खर्च होतील असे अंदाजित करण्यात आले होते.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यक्षेत्रातील एकूण २१८ खासगी शाळा ‘आरटीई’ मान्यतेशिवाय सुरू असून गेली अनेक वर्ष हा अनागोंदी कारभार चालू आहे.
मुंबईतील सगळ्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम ऑगस्ट अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचा दावा महापालिकेने केला होता.
रोहित पवार चौकशीला आले आता, रवींद्र वायकर कधी येणार? असा प्रश्न आता भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी विचारला आहे. ठाकरे सरकारच्या काळातले हे घोटाळे आहेत याचा हिशेब तर द्यावाच लागेल असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.
पुणे : ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला केलेल्या मद्य पार्टीची छायाचित्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे दाखवून वाभाडे काढले होते. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर आता पुन्हा चौकशीसाठी उपसमिती नेमण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ओल्या पार्टीची चौकशी लांबत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पुणे : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा बुधवारी पहाटे चारच्या सुमारास खराडीत पोहोचली. खराडीतून जरांगे पाटील सकाळी लोणावळ्याकडे मार्गस्थ होणार आहेत. पदयात्रेत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळपासून नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. नगर रस्ता, येरवडा, जहाँगीर चौक, संचेती चौक, गणेशखिंड रस्ता, ओैंध, सांगवी, डांगे चौकमार्गे पदयात्रा लोणावळ्याकडे जाणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा २६ जानेवारीला मुंबईत धडकणार असून २५ तारखेचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे.
नाशिकमधील राज्यस्तरीय अधिवेशनात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करत होते.
रामाच्या भक्तीचं नाटक करायचं आणि विरोधकांचा आवाज दडपायचा हे भाजपा करते आहे. आम्ही रोहित पवारांच्या पाठिशी आहोत. तसंच राजन साळवी, रवींद्र वायकर यांच्या मागेही आम्ही महाविकास आघाडी म्हणून उभे आहोत असं आज संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच नाशिकमध्ये मंगळवारी झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली. तसंच एकनाथ शिंदे यांनीही त्यांना जोरदार उत्तर दिलं.