Maharashtra News Updates, 22 August 2025 : राज्याच्या राजकारणातसत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या आरएसएसच्या एका बैठकीत उपस्थित राहिल्याच्या मुद्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यावरून अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील आक्षेप घेत टीका केली. त्यानंतर अखेर अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली. तसेच आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भात अनेक राजकीय पक्षांकडून पक्ष संघटनेचा आढावा घेतला जात आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी धमकी दिल्याच्या आरोपावरून काँग्रसचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Mumbai Breaking News Live Update : महाराष्ट्र व देशातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
“पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचं तीन ठिकाणी मतदान”, भाजपाचा आरोप, मुख्यमंत्री म्हणाले, “खरे वोट चोर कोण? राहुल गांधींनी उत्तर द्यावं!”
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी याच महिन्यात मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी हे आरोप करताना मतदार यादीतील घोळ समोर आणला, त्यानुसार जिवंत व्यक्तींना मृत दर्शवण्यात आले असून बोगस नावेही यादीत आहेत, काहींची नावे दोन-तीन मतदारसंघातही पाहायला मिळाली. आता, राहुल गांधींच्या आरोपानंतर भाजपानेही काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे मतदान तीन ठिकाणी असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. तसंच भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही एक पोस्ट केली आहे.
Rohit Pawar : "...तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केले कशाला?", कोकाटेंनी मानहानीची नोटीस पाठवताच रोहित पवारांचा संतप्त सवाल
John Abraham : अभिनेता जॉन अब्राहमची आधी सर्वोच्च न्यायालयाला विनंती; आता मानले आभार...
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून २ हजारहून अधिक बसगाड्यांचे नियोजन
ठाण्यात ३५ वर्ष जुन्या धोकादायक इमारतीचा भाग कोसळला
गडकरी नाट्यगृहात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचीच कोनशिला कोपऱ्यात ढकलली
फडणवीसांशी ‘त्या’ कॉलवर काय बोलणं झालं? शरद पवारांनी दिली माहिती; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत स्पष्ट केली भूमिका
Devendra Fadnavis And Sharad Pawar Phone Call Details: गेल्या महिन्यात जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. सत्ताधारी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भाष्य केले आहे. तसेच एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोनवर काय चर्चा झाली हे सुद्धा सांगितले आहे.
Sharad Pawar: शरद पवार गटाच्या बैठकीत चर्चा कमी आणि… जळगावमध्ये चाललंय तरी काय ?
रुग्णालय आणि नागरीवस्त्यांजवळ मिरवणुकांचे आवाज कमी ठेवा! जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन
पोळ्याला पळसाची फांदीच दारावर का ठेवली जाते?… सांगा कुणीतरी… हे आहे शास्त्रीय कारण…
“मी उद्धव ठाकरे, शरद पवारांना फोन केला होता; पण…”; देवेंद्र फडणवीसांची चर्चेबाबत माहिती
Devendra Fadnavis called Uddhav Thackeray Sharad Pawar : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केला होता. मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत, आपल्या राज्याचे राज्यपाल आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी समर्थन द्यावं अशी विनंती मी त्यांना केली
पुणे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक ९:३० वाजता सुरू होणार : मुरलीधर मोहोळ
पुणे : मानाच्या पाच गणपती मंडळांच्या अगोदरच सकाळी सात वाजता लक्ष्मी रस्त्यावरून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय शहरातील ६० सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भूमिका जाहीर केली होती. त्यावरून राजकीय वातावरण तपासण्यास सुरुवात झाली होती. त्या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्र बसून निश्चित तोडगा काढावा, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौर्यावर असताना मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली मानाचे पाच गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि इतर मंडळांचे अध्यक्ष यांच्या सोबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. या बैठकीत विसर्जन मिरवणूक सकाळी ९:३० वाजता सुरू करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
पोळा विशेष : महाराष्ट्रातील एकमेव बैलजोडीचा पोळा चौक; नेमका कुठे? स्वातंत्र्यपूर्व काळापासून उत्सवाची परंपरा
Devendra Fadnavis : "RSS काय बंदी असलेली संघटना आहे?", देवेंद्र फडणवीस यांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला उत्तर
राज ठाकरे यांच्या भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज ठाकरे यांनी माझी भेट घेतली. त्यांनी ट्रॅफिकच्या संदर्भात मला काही सूचना केल्या आहेत. राज ठाकरेंनी दिलेल्या सूचनांचं मी स्वागत करतो. कारण अशा प्रकारे ट्रॅफिकच्या संदर्भात कोणी सूचना करत असेल तर त्यांचं स्वागत आहे", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याची तयारी? काँग्रेस नेते नाना पटोले नेमके म्हणाले काय ?
पुसद येथील वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयातील प्राध्यापकांची पदोन्नती वादात; कोरमशिवाय कॅस अंतर्गत…
भाविकांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सव काळात मेट्रो सेवेच्या वेळेत वाढ; अजित पवारांनी केलं जाहीर
अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. गणेशोत्सव महायुतीच्या सरकारने राज्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारची सगळी यंत्रणा झोकून देऊन करणार यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून गणेश उत्सवाच्या काळात शहरातील मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत सुरू राहाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. इतकेच नाही तर शेवटच्या दिवशी म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी ही सेवा पूर्णपणे २४ तास सुरू ठेवण्याचा आमचा निर्णय झाला आहे, असेही अजित पवार म्हणाले.
खासदार धानोरकर यांचे भासरे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा भाजपात प्रवेश
खबरदार ! सर्पदंशावर अघोरी उपचार केल्यास होईल,,,
"तुम्ही जे पक्ष फोडले त्याच पक्षांकडे मत का मागता", खासदार संजय राऊतांची भाजपावर टीका
"तुम्ही जे पक्ष फोडले त्याच पक्षांकडे तुम्ही मत मागत आहात. हे फक्त आमच्याकडे नाही तर संपू्र्ण देशभरात अशा प्रकारे मते मागितली जात आहेत. आपल्याकडे बहुमत आहे असं तुम्ही म्हणता मग मते मागण्याची गरज नाही. तुम्हाला आमच्याकडे मते मागण्याचा काय अधिकार आहे?", अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.
आरएसएसशी संबंधित एका बैठकीला खासदार सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)