Maharashtra News Highlights: राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच म्मू आणि काश्मीरच्या पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. त्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. तसेच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकमधील मिरवणुकीमध्ये कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकल्याच्या कारणावरून राजकारण तापलं आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, यासह राज्यातील सर्व राजकीय घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Marathi News Live Today 16 May 2025 : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर

20:00 (IST) 16 May 2025

तिरंगा फेरीत महायुतीतील विसंवाद, शिंदे आणि अजित पवार गट दूर

नाशिकमध्ये तिरंगा फेरीचे आयोजन भारतीय सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ करण्यात आले असले तरी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पदाधिकारी दूर राहिल्याने विसंवाद स्पष्ट झाला. ...अधिक वाचा
18:36 (IST) 16 May 2025

इंदिरानगर बोगद्याजवळ परप्रांतीय मद्यधुंद विद्यार्थिनीचा धिंगाणा

नाशिकच्या इंदिरानगर बोगद्याजवळ २५ वर्षीय परप्रांतीय विद्यार्थिनीने मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात धिंगाणा घातला. हातात कैची घेऊन वाहन थांबवणे, दारूच्या बाटल्या उघडून पिणे आणि पोलिसांना आव्हान देणे अशी तिची वर्तणूक होती. ...वाचा सविस्तर
17:35 (IST) 16 May 2025

शरद पवारांचा सन्मान, वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला देण्यात आलं नाव

मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार यांच्या नावाच्या स्टँड्सचे उद्घाटन करण्यात आले. वानखेडे स्टेडियममधील या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित शर्मा यांच्यासह आदी अपस्थित होते.

https://platform.twitter.com/widgets.js

17:07 (IST) 16 May 2025

“माझं बालवाङ्मय वाचायचं वय राहिलं नाही”, राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांचा खोचक टोला

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचं उद्या (शनिवार, १७ मे) मुंबईत प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट पटकथालेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं जाणार आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख तथा ज्येष्ठ नेते शरद पवार व तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशित केलं जाईल. या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच यामधील मजकूरावरून, राऊतांनी केलेल्या काही दाव्यांवरून मोठा राजकीय गोंधळ सुरू झाला आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. दरम्यान, प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधिंनी या पुस्तकातील मजकुराबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता, “मी बालवाङ्मय (बालसाहित्य) वाचत नाही”, अशी खोचक टिप्पणी केली.

वाचा सविस्तर

16:20 (IST) 16 May 2025

आर्थिक गणिते सुरळीत करण्यासाठी पक्षप्रवेशांच्या घडामोडी घडल्या;जितेंद्र आव्हाड यांची पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांवर टिका

मी चिंता करणारा माणूस आहे. पण, पक्ष प्रवेश घडामोडीची मला चिंता वाटली नाही. कारण, गेल्या एक वर्षापासून मला छळत होते. माझ्या बाजूला बसून माझ्या मागे बॉम्ब लावत होते. ...सविस्तर बातमी
16:01 (IST) 16 May 2025

राष्ट्रवादी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार का? भुजबळ म्हणाले, "या निवडणुका कार्यकर्त्यांच्या..."

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असा नारा महायुतीतील पक्षामधून दिला जात आहे. मग याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? असा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की, “याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत. पण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे काही ठिकाणी वेगळ्या निवडणुका लढू शकतात”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

15:56 (IST) 16 May 2025

एकनाथ खडसे यांनी ग्रामपंचायत निवडून आणावी मग…गिरीश महाजन यांचे आव्हान

सिंहस्थ कुंभमेळा दोन वर्षावर आलेला असताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसून, विकास कामांनाही चालना मिळालेली नाही. ...वाचा सविस्तर
15:20 (IST) 16 May 2025

पाणी पुरवठ्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप,आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठ्याच्या नियोजनातील चुका दाखवत शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने 'लबाडांनो पाणी द्या' या घोषणांसह मोर्चा काढण्यात येत आहे. ...सविस्तर वाचा
14:37 (IST) 16 May 2025

डोंबिवलीत श्रीधर म्हात्रे चौक सीमेंट काँक्रीट रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक नाराज; गरीबाचावाडा उत्कर्ष मंडळाचा आंदोलनाचा इशारा

श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी या सुमारे ५०० मीटर लांबीच्या सीमेंट काँक्रीट रस्त्याच्या रूंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम गेल्या वर्षीपासून एमएमआरडीएच्या निधीतून सुरू आहे. ...सविस्तर बातमी
14:26 (IST) 16 May 2025

सांगलीत पत्नीचा खून करुन पोलीस ठाण्यात हजर

सांगलीतील शिंदेमळा भागात घरगुती वादातून पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केला. अनिता सीताराम काटकर असे मृत महिलेचे नाव आहे. खून केल्यानंतर पती सीतारामने थेट पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. ...सविस्तर वाचा
14:23 (IST) 16 May 2025

ठाण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या

याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...वाचा सविस्तर
13:55 (IST) 16 May 2025

Chhagan Bhujbal : शरद पवार अन् अजित पवार एकत्र येतील का? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले, "काही लोकांच्या…"

शरद पवार यांच्या या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा रंगल्या होत्या. ...सविस्तर बातमी
12:58 (IST) 16 May 2025

मनमाडमध्ये अपघातात शेतकऱ्यासह मुलाचा मृत्यू

अपघातात सोनवणे यांचा पुतण्या किशोर (२५) हा गंभीर जखमी झाला. सोनवणे कुटुंबिय येवला तालुक्यातील नगरसूल जवळील वडाचा मळा येथील रहिवासी आहे. ...सविस्तर बातमी
12:45 (IST) 16 May 2025

कल्याणमधील साहित्यिक पोलीस अधिकारी अर्जुन डोमाडे यांच्या कथासंग्रहाला पुरस्कार

या पुस्तकातील आशय विचारातून कुंडल कृष्णाई या साहित्य चळवळीतील संस्थेने पोलीस अधिकारी डोमाडे यांच्या कथासंग्रहाची कुंडल कृष्णाई उत्कृष्ट वाडमय पुरस्कारासाठी निवड केली. ...सविस्तर बातमी
12:39 (IST) 16 May 2025

राज्यातील सर्वोत्तम ५ महामंडळांची निवड जाहीर, मुख्यमंत्री फडणवीसांनी महामंडळांचं केलं अभिनंदन

"१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा होती. या कार्यक्रमात शासनाच्या सर्व ९५ महामंडळांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! या १०० दिवसांच्या स्पर्धेतून निवडलेल्या राज्यातील सर्वोत्तम ५ महामंडळांची निवड या ठिकाणी जाहीर करताना मला आनंद होत आहे. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित निकाल:

1. महसूली विभागनिहाय सर्वोत्तम तालुका कार्यालयांचा निकाल आज सायंकाळी याच ठिकाणी जाहीर होईल.

2. राज्यातील सर्वोत्तम विभागीय कार्यालये व जिल्हा कार्यालये यांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर होईल याच ठिकाणी २३ मे रोजी जाहीर करण्यात येईल.

https://platform.twitter.com/widgets.js

12:30 (IST) 16 May 2025

सुरत-भुसावळ डाउन मार्गावरील रेल्वे वाहतूक अखेर सुरळीत… अप मार्गावरील वाहतूक ठप्पच

अप मार्गावरील वाहतूक अजूनही ठप्पच असून, ती सुरळीत करण्यासाठी रेल्वेकडून अपघातग्रस्त डबे रूळावरून हटविण्याचे काम सुरूच आहे. ...सविस्तर बातमी
12:25 (IST) 16 May 2025

खान्देशातील केळी भावात तेजी…देशांतर्गत मागणी आणि निर्यातीला चालना मिळाल्याचा परिणाम

सद्यःस्थितीत रावेर आणि बऱ्हाणपूर भागातून तुरळक केळीची आवक सुरू आहे. काही गावातील केळीची आवक १५ जूननंतर सुरू होण्याची शक्यता आहे. ...सविस्तर बातमी
12:11 (IST) 16 May 2025

Child Marriages : बालविवाह रोखण्यात नंदुरबार जिल्हा प्रशासनाला यश

बालविवाह केल्यास होणाऱ्या शिक्षेपासून पालक अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांना या कायद्याची जाणीव करुन देणे हे प्रशासनाचे काम आहे. ...सविस्तर बातमी
12:01 (IST) 16 May 2025

मिरा भाईंदर भाजपमध्ये मराठी समाजाला डावलण्याचा प्रयत्न ? जबाबदारीच्या पदावर संधी न मिळाल्याने अंतर्गत नाराजी

मागील दोन दशकांपासून मिरा भाईंदर शहरात गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ...अधिक वाचा
11:57 (IST) 16 May 2025

मराठा आरक्षणाच्या याचिकांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांचे विशेष पूर्णपीठ स्थापन करण्यात आले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी मराठा आरक्षणाच्या याचिकांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन केले.

सविस्तर वाचा

11:12 (IST) 16 May 2025

चक्रीसदृश्य वादळाने गौरापुर येथील २० कुटुंबीयांची घरे उध्वस्त; शासन व प्रशासनाकडून पीडित कुटुंबियांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याची मागणी

६ मे व ७ मे या दोन दिवस सतत पडलेल्या अवकाळी पावसामुळे घरे, शेतकऱ्यांचे, वीट उत्पादकांचे व फळबागायतदारांचे मोठे नुकसान झाले असतानाच आता थेट चक्रीसदृश वादळाने गौरापुर वासियांना "जोर का झटका" दिला आहे. ...अधिक वाचा
10:53 (IST) 16 May 2025

"संजय राऊत काय बोलतात हे कोणी ऐकत नाही", गिरीश महाजन यांची टीका

"संजय राऊत काय बोलतात हे कोणी ऐकत देखील नाही आणि त्यांच्याबाबत कोणी काही बोलत देखील नाही. ते वाट्टेल ती बडबड करत असतात. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा असंही ते म्हणाले होते. मात्र, आता संजय राऊत यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांच्यावर काही न बोललेलं बरं", असं म्हणत गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

10:27 (IST) 16 May 2025

"...म्हणून मला तुरुंगात पाठवलं", खासदार संजय राऊत यांचं विधान

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, "मला राजकीय सुडापोटी तुरुंगात पाठवलं. मी पुस्तकामधून माझे अनुभव मांडले आहेत. मी पुस्तकात फक्त काही संदर्भ दिले आहेत की गेल्या ३० ते ३५ वर्षांत काय राजकीय घडामोडी घडल्या आणि काय गोष्टी घडत आहेत. या पेक्षा अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत. पुस्तकात लिहिलेल्या अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. मी एकच संदर्भ दिला शरद पवार असतील किंवा बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव राजकारण न पाहता मदत करण्याचा राहिला. मात्र, पुढे त्यांचेच पक्ष फोडले गेले", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Shirsat

मंत्री संजय शिरसाट यांची खासदार संजय राऊत यांच्यावर टीका, (फोटो-संग्रहित छायाचित्र)